कुमार भवन, कडगाव येथे गुणगौरव व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कुमार भवन, कडगाव येथे गुणगौरव व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
कुमार भवन. कडगाव (ता.भुदरगड) प्रशालेत एनडीए (NEVI) मध्ये देशात बारावा व मुलांमध्ये राज्यात पहिला आलेल्या कु.आदित्य सुरेश जाधव व त्यांचे वडील यशस्वी उद्योजक श्री. सुरेश कृष्णा जाधव यांचा सत्कार व विशेष मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.एस.आर.पाटील होते.
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी या उद्बोधक मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कु.आदित्य जाधव यांनी एनडीए साठी स्वतः केलेली तयारी तसेच त्या क्षेत्राची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री.सुरेश जाधव यांनी मुलांना कष्ट व चिकाटीने आपले ध्येय काढण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याबद्दल मार्गदर्शन केले. गरीब कुटुंबातूनही आपण कष्ट करून आपले ध्येय गाठू शकतो. याबद्दल स्वतःच्या आयुष्यातील उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षक श्री.एस.बी. हजारे, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.एम.पी.पाटील यांनी केले. सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री.पी.ए.कुंभार यांनी करून दिले. आभार श्री.ए.पी.धबधबे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
