प्रा.सुनिल देसाई यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्राप्त
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
प्रा.सुनिल देसाई यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्राप्त
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.आर. व्ही. देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मिणचे खुर्द (ता. भुदरगड) या प्रशालेचे येथील सहा.शिक्षक प्रा.सुनिल रंगराव देसाई यांना शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून पीएच.डी.पदवी देण्यात आली. त्यांनी मराठी विषयाच्या अंतर्गत ‘महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण’ (आपले महाभारत, महाभारताचा मराठी अनुवाद प्राचार्य द. गो. दसनुरकर यांच्या अनुषंगाने) याविषयी प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता.
प्रा. देसाई यांना डाॅ. मांतेश हिरेमठ, विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. डाॅ. राजन गवस, डॉ. जालंधर पाटील, डॉ. मनमोहन राजे, डॉ. गोमटेश्वर पाटील, डाॅ. युवराज देवाळे, संस्था अध्यक्ष श्री. आर. व्ही. देसाई, सचीव श्री. रणजीत देसाई यांचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
