गारगोटी हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सायली डवंग व प्रगती पाटील प्रथम
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सायली डवंग व प्रगती पाटील प्रथम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सायली अजित डवंग हिने तर मोठ्या गटात कु.प्रगती गजराज पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. हिंदी दिन समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक श्री.सतीश केदारे प्रमुख उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा – लहान गट : कु.सायली अजित डवंग, पार्थ संतोष वडर, अर्णव साताप्पा आरेकर, हर्षवर्धन विकास देसाई, दूर्वा दशरथ घावरे
मोठा गट : प्रगती गजराज पाटील, ऋग्वेद दत्तात्रय मोरसे, राजेश्वरी दीपक देसाई, तस्मिया तनवीर बागवान, श्रेया मारुती खोत
याप्रसंगी भित्तीपत्रकाचे उदघाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक श्री.सतीश केदारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.सतीश केदारे, कु.सायली डवंग, प्रगती पाटील श्री.आर.वाय.देसाई, युवराज शिगांवकर व राजेश गिलबिले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे बाळासाहेब कांबळे, डी.जी.लकमले, जी डी. ठाकूर, आर.पी.गव्हाणकर, पी.पी.भंडारी, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी.के.इंगळे, धीरज मेंगाणे, सौ.राजवी साठे, ऋषिकेश गव्हाणकर, श्रावणी मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत बी ए डावरे यांनी, प्रास्ताविक ऋग्वेद मोरसे याने, आभार श्रेया खोत हिने तर सूत्रसंचलन राजेश्वरी देसाई व स्वराली वास्कर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





