कंपनी सेक्रेटरी (CS) हा उत्कृष्ट संधींनी भरलेला करिअरचा पर्याय : जयदीप पाटील
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कंपनी सेक्रेटरी (CS) हा उत्कृष्ट संधींनी भरलेला करिअरचा पर्याय : जयदीप पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
विद्यार्थ्यांनी योग्यवेळी आपल्या करिअरची दिशा ठरवणे अत्यंत आवश्यक असून कंपनी सेक्रेटरी (CS) हा एक उत्कृष्ट आणि संधींनी भरलेला करिअरचा पर्याय आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर चॅप्टर ऑफ WIRC ऑफ ICSI चे चेअरमन आणि प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी जयदीप पाटील यांनी केले.
श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कडगाव (ता.भुदरगड) येथे आयोजित ‘करिअर संधी’ या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर चॅप्टर ऑफ WIRC ऑफ ICSI चे चेअरमन आणि प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी जयदीप पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना जयदीप पाटील यांनी कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कोर्सची संपूर्ण माहिती, यासाठी लागणारा खर्च, तसेच कंपनी सेक्रेटरी झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी यावर सविस्तर माहिती दिली. कॉर्पोरेट क्षेत्रात कायदेशीर सल्लागार, कंपनी कायदेविषयक जबाबदाऱ्या आणि सल्लागार सेवांमध्ये कंपनी सेक्रेटरीला मोठी मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासाची शिस्त, करिअर नियोजन आणि उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.प्रारंभी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ.वीरमती निंबाळकर यांनी केले. आभार
प्रा.युवराज भंडारी यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





