नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रंथदान हे केवळ पुस्तकांची देवाणघेवाण नव्हे, तर ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा दुसऱ्या पिढीकडे सुपुर्द करण्याचा क्षण : साहित्यिक जीवन साळोखे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्रंथदान हे केवळ पुस्तकांची देवाणघेवाण नव्हे, तर ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा दुसऱ्या पिढीकडे सुपुर्द करण्याचा क्षण : साहित्यिक जीवन साळोखे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रंथदान हे केवळ पुस्तकांची देवाणघेवाण नव्हे, तर ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा दुसऱ्या पिढीकडे सुपुर्द करण्याचा क्षण : साहित्यिक जीवन साळोखे

दूधगंगा विद्यालय कागल येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
ग्रंथदान समारंभ म्हणजे केवळ पुस्तकांची देवाणघेवाण नव्हे, तर ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपुर्द करण्याचा क्षण असून पुस्तके म्हणजे ज्ञानाचा अक्षय साठा आहे, असे उदगार जेष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी काढले.
कागल तालुका कला,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित दूधगंगा विद्यालय कागल येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आयोजित ग्रंथदान समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व जेष्ठ पत्रकार अतुल जोशी, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, श्रीनाथ उद्योग समुहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, गंगाराम शेवडे, मुख्याध्यापक अशोक बुगडे, तसेच विविध हायस्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना जीवन साळोखे म्हणाले, विद्यार्थी हे ज्ञानमंदिराचे खरे लाभार्थी असून नवीन पुस्तकांचे जास्तीत जास्त वापर करावे. वाचन हे एक उत्तम व्यसन आहे. जेव्हा एखादे चांगले पुस्तक वाचतो त्यावेळी वाचक एका नव्या जगात प्रवेश करतात. वाचन ही विचारांची आणि व्यक्तिमत्वाची समृद्धी असून प्रत्येक विद्यार्थ्याने नित्यनियमाने वाचन करून आपले लेखन, वाचन, श्रवण आणि संभाषण कौशल्य वृद्धिंगत करावे असे आवाहन त्यांनी केले.तर शालेय ग्रंथालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५ पुस्तके व शिक्षकामागे २५ पुस्तके असावीत. तसेच प्रत्येक शाळेतील ग्रंथालय व प्रत्येक गावातील वाचनालये विविध ग्रंथांनी सुसज्ज असावीत असे मत व्यक्त केले. वाचनाचे महत्त्व सांगतांना त्यांनी विविध राष्ट्रपुरुष, ज्येष्ठ साहित्यिक यांची उदाहरणे दिली व वाचन चळवळीचे सर्वांनी भागीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले .
यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व जेष्ठ पत्रकार अतुल जोशी यांनी ग्रंथदान समारंभानिमित्त ग्रंथदान करणारे जेष्ठ साहित्यिक, शिवराज विद्यालयाचे माजी प्राचार्य जीवन साळोखे यांचे अभिनंदन करत विशेष कौतुक केले. पुढे ते म्हणाले, पुस्तके ही आपली सर्वात जवळची आणि विश्वासू मित्र असतात. जगातील विविध गोष्टी शिकवतात, नवनवीन कल्पनांची ओळख करून देतात. पुस्तकांमुळेच आपल्याला इतिहास कळतो, वर्तमान समजतो आणि भविष्याची वाटचाल ठरवता येते. साहित्यिकांनी विविध शाळांना, ग्रंथालयांना दान केलेली पुस्तके केवळ कागदाची पाने नाहीत,तर ज्ञान आणि अनुभवांचा खजिना आहे. तसेच प्रत्येकांनी दररोज किमान पाच पानांचे वाचन करावे आणि वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ.ए.पी .जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगताना प्रत्येक विद्यार्थ्यांने मोठी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त करताना इच्छाशक्ती असेल तर कठिण प्रसंगावर मात करत स्वप्न पूर्ण करता येतात असे सांगितले. वाचनाने माणूस समृद्ध बनतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग जोपासावा असे आवाहन त्यांनी केले व विद्यार्थ्यांमधून लेखक,कवी, साहित्यिक घडावा अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी १५ हायस्कूल व २ ग्रंथालयांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची पुस्तके व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे खंड दान करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केले. सुत्रसंचलन संग्रामसिंह यादव यांनी केले तर आभार नाथा चव्हाण यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031