श्रमणारे हातच वळणदार सुंदर अक्षराप्रमाणे जीवनाला आकार देतात : अक्षरमित्र बी. के. गोंडाळ
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
श्रमणारे हातच वळणदार सुंदर अक्षराप्रमाणे जीवनाला आकार देतात : अक्षरमित्र बी. के. गोंडाळ

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
मनात उच्चप्रतीचे ध्येय ठेवून जिद्दीने सातत्यपूर्ण सराव केल्यास आपल्या हाताने अक्षरांना योग्य वळण दिल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होवू शकते. कारण आपला हात जगन्नाथ असतो. आपल्या हाताने ज्याची पेरणी करु तेच उगवून आपल्या हाती येत असते. कोणत्याही ठिकाणी श्रमणारे हातच वळणदार सुंदर अक्षराप्रमाणे जीवनाला आकार देतात, असे उदगार जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी काढले.
राजापूर तालुक्यातील श्रीम.उ. श. परुळेकर माध्यमिक विद्यालय, वडवली येथे बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश साखळकर तसेच सहाय्यक शिक्षक विलास शिंदे व प्रभात मेस्त्री उपस्थित होते.
बी.के.गोंडाळ यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ राजापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरू केला आहे. वडवली हायस्कूल ही या उपक्रमातील चौवीसावी शाळा आहे. या उपक्रमासाठी आपल्या अनेक मित्रांच्या आर्थिक सहकार्यातून एक वही तयार केली आहे. ही वही विद्यार्थ्यांना मोफत दिली जाते. या वहीच्या माध्यमातून प्रत्येक अक्षरांच्या काना मात्रा उकार यांचा कृतीयुक्त सराव घेतला जातो. आणि हस्ताक्षर सुधारण्याबाबतचे मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमांसाठी राजापूर तालुक्यांच्या सर्व स्तरातून बी. के. गोंडाळ यांचे अभिनंदन होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





