कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती ‘उत्तम वाचक पुरस्कार’ जागृती भांबले हिने पटकावला
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती ‘उत्तम वाचक पुरस्कार’ जागृती भांबले हिने पटकावला

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयामध्ये यावर्षीचा कै. सौ. सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार इयत्ता नववीतील विद्यार्थीनी जागृती दिनेश भांबले हिने पटकावला. शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, श्यामची आई पुस्तक व रोख पाचशे रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच उत्तेजनार्थ दुर्वेश मांडवे, आयुषी लाड, वेदिका पुजारे व अमृता भिवंदे यांना श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमांच्या प्रारंभी मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या सौजन्याने त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरणाचे हे सातवे वर्ष आहे.
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे पाच हजार रुपयांची कायम स्वरूपी ठेव ठेवण्यात आली असून त्याच्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो.
वर्षभर शाळेच्या ग्रंथालयातून दर शनिवारी विद्यार्थी पुस्तके घेवून जातात. वाचलेल्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकातील आवडलेली व्यक्ती, पात्र, ती व्यक्ती का आवडली. पुस्तकातील मूल्यविचार पुस्तकातून आपण काय शिकलो परीक्षण केले जाते. यावेळी मूल्याकनासाठी आलेल्या वह्यांमधून जागृती भांबले हिच्या वहीचे नामांकन करण्यात आले.
यावेळी रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी. के. गोडाळ या शिक्षकांसह वासुदेव भिवंदे, सुरेश गोसावी व विद्यार्थी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





