कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.क्षितिजा पंडित हिची ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी निवड : कृषीकन्येची भरीव कामगिरी
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.क्षितिजा पंडित हिची ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी निवड : कृषीकन्येची भरीव कामगिरी

ज्ञानप्रतिनिधी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.क्षितिजा पंडित हिची बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र महाविद्यालय, जळगांव येथे होणाऱ्या २१ व्या आंतरराज्य विद्यापीठ सांस्कृतिक स्पर्धेसाठी शास्त्रीय गायन, वादन, फोक ऑर्केस्ट्रा या प्रकारात निवड झाली आहे.
सदरची स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान जळगांव येथे घेतली जाणार आहे असून त्यामध्ये कृषी महाविद्यालय पाल तर्फे कु. क्षितिजा पंडित ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल.
संस्थाध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, सर्व व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी, प्राचार्य डॉ. दिपाली गोसावी आणि कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून कु. क्षितिजा पंडित हिचे अभिनंदन करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





