नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , GST विभागाची मोठी कारवाई, सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

GST विभागाची मोठी कारवाई, सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (GST) करचुकवेगिरी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे अशी या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे.टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय 197 कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि 29 कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून 29 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल  नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी 16 मार्च रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा 2017 नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अन्वेषण अधिकारी सहायक राज्यकर आयुक्त  श्रीकांत पवार हे राज्यकर उपआयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31