नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.मौनी विद्यापीठाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणासाठी चाकोरीबाहेरच्या शिक्षणाचा देशातील पहिला प्रयोग राबवणार: कुलगुरु डॉ.राजनीश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.मौनी विद्यापीठाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणासाठी चाकोरीबाहेरच्या शिक्षणाचा देशातील पहिला प्रयोग राबवणार: कुलगुरु डॉ.राजनीश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.मौनी विद्यापीठाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणासाठी चाकोरीबाहेरच्या शिक्षणाचा देशातील पहिला प्रयोग राबवणार: कुलगुरु डॉ.राजनीश

‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण- शहरी शैक्षणिक दरी कमी करणे’ या विषयावरील मुक्त संवाद संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरच ग्रामीण आणि शहरी शैक्षणिक दरी कमी करू शकेल.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शैक्षणिक गुणवत्ता, दर्जा व कौशल्यपूर्ण शिक्षण देता येईल. श्री.मौनी विद्यापीठासारख्या संस्थांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणाचा प्रयोग राबवणार असून चाकोरीबाहेरच्या ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणाचा देशातील पहिला प्रयोग असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजनीश कामत यांनी सांगितले.
येथील श्री.मौनी विद्यापीठातर्फे आयोजित ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण- शहरी शैक्षणिक दरी कमी करणे’ या विषयावरील मुक्त संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) होते. नाबार्डचे माजी अध्यक्ष, मौनी विद्यापीठाचे महासंचालक डॉ. यशवंतराव थोरात, गरवारे टेक्निकल फायबर्सचे अध्यक्ष डॉ. संजय चराटी, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाच्या सी. ओ. ई. देवश्री पाटील, माजी प्राचार्या डॉ. अनिता बोडके, मौनी विद्यापीठाच्या विश्वस्त सौ. पल्लवी कोरगावकर,
सदस्य बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, मौनी विद्यापीठात विविध कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू केले जाईल. येथे अनेक लहान अभ्यासक्रम सुरू केले जातील. यासाठी शिवाजी विद्यापीठ पूर्णतः सहकार्य करेल. ‘एक विद्यापीठ, दहा महाविद्यालये, शंभर शाळा’ हा उपक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला असून यामध्ये मौनी विद्यापीठाचा पहिला समावेश असेल. कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांकडे सध्या विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे. यासाठी त्यांच्या ऑनलाइन शिक्षण व थेट कृतीयुक्त प्रशिक्षणावर भर दिला जाईल.
ते म्हणाले, सद्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ‘ए. आय.’ तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार नसून नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. येत्या काळात या क्षेत्रात ४० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
डॉ. यशवंतराव थोरात यांनी विषयाची मांडणी केली. ते म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करणे ही काळाची गरज आहे. सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानामुळे ग्रामीण व शहरी भागातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले. आजही गुणवत्ता, दर्जा, रोजगाराच्या संधी यामध्ये ग्रामीण विद्यार्थी पाठीमागे आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि मौनी विद्यापीठाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सतत आवश्यक ज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे. हे विद्यापीठ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निर्मिती आणि प्रत्यक्ष रोजगार देण्यातील दुवा ठरावे.
चेअरमन मधुकर देसाई मौनी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेऊन मौनी विद्यापीठ हे ग्रामीण विद्यापीठ म्हणून आजही ओळख आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दर्जेदार व नवीन तंत्रज्ञानातील अद्ययावत व्यावसायिक व कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर राहिल. रोजगाराभिमुख शिक्षण, संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रभावी केंद्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. संजय चराटी यांनी मनोगत केले. मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, सुप्निल तांबेकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. डॉ. ऋतुजा लाड यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर हिरे महाविद्यालयाने कार्यक्रमाचे संयोजन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031