नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा
कडगाव प्रतिनिधी
श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कडगाव येथे ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस निसर्गात दरवर्षी उगवणाऱ्या रानभाज्या मानवी जिवनास मोठा आधार ठरतात. पावसाळ्यात उगवणाऱ्या सर्व रानभाज्याचे गुणधर्म सारखेच असून प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. या नैसर्गिक रानभाज्यांमध्ये खते, कीटकनाशके नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्त व आरोग्यास उपयुक्त ठरतात. याचबरोबर, पावसाळ्यात ज्यावेळी अन्य भाज्यांची आवक कमी असते त्यावेळी या रानभाज्या मोफत व विपुल प्रमाणात उपलब्ध होतात.
या महोत्सवात प्रामुख्याने पात्री, भांगरी, कुरडू, तोंदली, शेवगा, आघाडा, मोहर, कुसुंबा, अंबाडा, घोळ, आळू, चिचुरटी, करटोली, कांगुणी आणि गुणगुणा इत्यादी दुर्मिळ अशा आरोग्यदायी रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता.
मानवी जीवनातील रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा. सौ.डिसोझा यांनी केले. सुत्रसंचालन प्राध्यापिका सौ. सागरिका पाटील यांनी केले व प्रास्ताविक प्राध्यापिका सौ.संयोगिता पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका स्नेहा कांबळे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930