नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *कंत्राटीकरण व खाजगीकरणाच्या विरोधात वज्रमूठ गरजेची : श्री.मदन कारंडे*   *इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न*  – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*कंत्राटीकरण व खाजगीकरणाच्या विरोधात वज्रमूठ गरजेची : श्री.मदन कारंडे*   *इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न* 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*कंत्राटीकरण व खाजगीकरणाच्या विरोधात वज्रमूठ गरजेची : श्री.मदन कारंडे*

*इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न*

इचलकरंजी प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नोकरभरती बाबत खाजगीकरण व कंत्राटीकरणाचे जे अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.त्या विरोधात सर्व शैक्षणिक संघटनांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात वज्रमूठ करणे गरजेचे आहे. शासनाच्या धोरणाविरोधात शनिवारी ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपली ताकद शासनाला दाखवून द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री. मदन कारंडे यांनी केले.

देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज मध्ये आयोजित इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीवेळी बोलत होते .सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय पुंडलिक भाऊ जाधव साहेब हे होते. त्यांनी यावेळी शासनाला कंत्राटीकरण व खाजगीकरणाच्या बाजूने निर्णय घेऊन गरीब व दीनदलित लोकांवर अन्याय करता येणार नाही ही लोकशाही असू शकत नाही. हे शासनाला ठणकावून सांगण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. प्रारंभी इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राध्यापक शेखर शहा यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी इचलकरंजी शहर शिक्षण संस्था संघटनेचे सचिव श्री नंदकुमार इनामदार यांनी सध्या शैक्षणिक क्षेत्रात प्रलंबित असलेल्या सर्व प्रश्नांचा ऊहापोह आपल्या भाषणात घेतला. तर मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर श्री.इरफान अन्सारी सर व संपर्क प्रमुख श्री.अशोक हुबळे यांनी शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणीक व्यासपीठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

याबैठकीस इचलकरंजी शहर शिक्षण संस्था संघटनेचे पदाधिकारी श्री.अरुण खंजिरे साहेब, श्री.राजेंद्र सांगले, श्री.अमरसिंह माने यांच्यासह सर्वश्री संजय देमाना, श्री प्रशांत गुरव, श्री पी डी शिंदे, श्री बी ए कोळी, श्री शिवाजी पाटील ,श्री महंमद नाकाडे ,श्री विलास रामाने, श्री.नंदकुमार गाडेकर, श्री शंकर पोवार, श्री सचिन वारे, श्री.वि ह सपाटे आदी सह विविध संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930