नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *आ.जयंत आसगावकर यांची पुणे विभागातच नव्हे तर राज्यात वेगळी ओळख : माजी मंत्री, आमदार दत्तामामा भरणे*   *आ.आसगावकर यांच्या फंडातून इंदापूर तालुक्यातील ८२ शाळांना प्रिंटर वाटप*  – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*आ.जयंत आसगावकर यांची पुणे विभागातच नव्हे तर राज्यात वेगळी ओळख : माजी मंत्री, आमदार दत्तामामा भरणे*   *आ.आसगावकर यांच्या फंडातून इंदापूर तालुक्यातील ८२ शाळांना प्रिंटर वाटप* 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*आ.जयंत आसगावकर यांची पुणे विभागातच नव्हे तर राज्यात वेगळी ओळख : माजी मंत्री, आमदार दत्तामामा भरणे*

*आ.आसगावकर यांच्या फंडातून इंदापूर तालुक्यातील ८२ शाळांना प्रिंटर वाटप*

 

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इंदापूर

शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या कार्यामुळे पुणे विभागातच नव्हे तर राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे उदगार माजी मंत्री, आमदार दत्तामामा भरणे यांनी काढले.

आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक फंडातून इंदापूर (जि.पुणे) तालुक्यातील ८२ शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप समारंभात माजी मंत्री, आमदार दत्तामामा भरणे बोलत होते. आमदार दत्तामामा भरणे आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार दत्तामामा भरणे म्हणाले, माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे. मी सतेज पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी शिक्षकांसाठी एक चांगला आमदार विधिमंडळात पाठवलेला आहे.

शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत, अशी माझी अपेक्षा आहे. ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. ज्ञानदानाचे पवित्र काम शिक्षक बांधव करतात, त्यामुळे त्यांना सन्मान दिलाच पाहिजे. त्यांचा राजकीय हेतूसाठी वापर करणे गैर आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाचेच काम करावे. त्यांना अतिरिक्त कामे देऊ नये, याच्याशी मी सहमत असल्याचे आमदार दत्तामामा भरणे म्हणाले.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शासनाकडून शिक्षणाचे सुरू असलेले खाजगीकरण, कंपनीकरण हाणून पाडायचे असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. आज आमच्या संघटना शिथिल झाल्यानेच शासनाला फावत आहे. त्यामुळे आपण जोवर संघटित होत नाही, तोवर शासन आपल्याकडे लक्ष देणार नाही. शासनाच्या या खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठीच आम्ही येत्या ३० सप्टेंबर रोजी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढत आहोत. इतर जिल्ह्यातही असे मोर्चे काढून शासनाचा हा डाव हाणून पाडणे गरजेचे आहे. आज शिक्षण क्षेत्रात बरेच प्रश्न प्रलंबित असले, तरी ते सोडवण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. माझ्या स्थानिक फंडातून प्रत्येक शाळेपर्यंत शैक्षणिक साहित्य पुरवणार असल्याचे आमदार जयंत आसगावकर म्हणाले.

यावेळी पंचायत समिती, इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राम पाडुळे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कौन्सिल सदस्य सुभाष गायकवाड, इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव काळे, नंदकुमार शिंदे, जयवंत जाधव, सदस्य भिवाजी शिंदे व मचाले सर, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल बंडगर, राष्ट्रवादी शिक्षक सेल इंदापूरचे अध्यक्ष सुनील मोहिते, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादा शेंडगे, विजय जाधव, सुभाष कलागते, संजय पाटील, श्रीधर गोंधळी, संदीप पाथरे, राहुल पोटगण यांच्यासह इंदापूर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930