नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या ६० व्या अधिवेशन अध्यक्षपदी निवडीबद्दल श्री.खंडेराव जगदाळे यांचा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सत्कार* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या ६० व्या अधिवेशन अध्यक्षपदी निवडीबद्दल श्री.खंडेराव जगदाळे यांचा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सत्कार*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या ६० व्या अधिवेशन अध्यक्षपदी निवडीबद्दल श्री.खंडेराव जगदाळे यांचा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सत्कार*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे यांच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ६० व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री.खंडेराव जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्याभवन, कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत श्री.जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री.एस.डी लाड होते.

यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे म्हणाले, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या ६० व्या अधिवेशन अध्यक्षपदी माझी झालेली निवड हा कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचा सन्मान आहे. अधिवेशन यशस्वीतेसाठी सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, प्राथमिक शिक्षक संघाचे राजाराम वरुटे, खाजगी प्राथमिक शाळा समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शाळा कृती समितीचे बाबा पाटील, पालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. जी. बोराडे, मुख्याध्यापक संघाचे व्हाईस चेअरमन मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, अजित रणदिवे, अशोक हुबळे, संस्था चालक संघाचे शिवाजी माळकर, साहेबराव शेख, शिक्षक परिषदेचे उदय पाटील, के. के. पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी. एस. पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सुरेश खोत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सी. एम. गायकवाड, शिक्षकेत्तर सेवक संघटनेचे मनोहर जाधव, सुधाकर सावंत, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सुधाकर निर्मळे, शिक्षण संघर्ष संघटनेचे श्रीधर गोंधळी यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930