नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आ.जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही* *आ.आसगावकर यांच्या फंडातून बारामती, दौंड (जि.पुणे) तालुक्यातील १०५ शाळांना प्रिंटर वाटप* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आ.जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही* *आ.आसगावकर यांच्या फंडातून बारामती, दौंड (जि.पुणे) तालुक्यातील १०५ शाळांना प्रिंटर वाटप*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आ.जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही*

*आ.आसगावकर यांच्या फंडातून बारामती, दौंड (जि.पुणे) तालुक्यातील १०५ शाळांना प्रिंटर वाटप*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, बारामती
मला शिक्षकांच्या प्रश्नांची पूर्णपणे जाण असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन या प्रश्नावर चर्चा करून ते सोडविले जातील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड तालुक्यातील शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप कार्यक्रमात नाम. पवार बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते १०५ शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या पाल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते क्षेत्र त्यांना निवडू द्या. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या निधीचा वापर शाळांना गरजेचे साहित्य देण्यासाठी केला ही गौरवास्पद बाबा आहे. शिक्षक आपल्या शैक्षणिक कामापासून आणि विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आमदार जयंत आसगावकर यांनी शाळांना प्रिंटर वाटपाचा जो उपक्रम हाती घेतला आहे, तो खरोखरच स्तुत्य आहे.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्यास बाळगणारे शिक्षक आमदार म्हणून जयंत आसगावकर यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षकांनी मिळालेल्या या प्रिंटरचा पुरेपूर वापर करावा.
सध्या खाजगी अकॅडमीचे अक्षरशः पेव फुटलेले आहे. या अकॅडमी पालकांकडून भरमसाठ फी आकारत आहेत. हे रोखण्यासाठी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील.
आमदार जयंत आसगावकर यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे, शिक्षक भरती करावी, पटसंख्या निकषात शिथीलत आणावी, शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नये, शालार्थ आयडी मिळावी आदी मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे साकडे घातले. ते म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न मार्गी लागावे यासाठी अजित दादांनी स्वतः लक्ष घालावे. माझ्या मतदारसंघातील एकही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही. प्रिंटर वाटपात पारदर्शकता ठेवली असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येक शाळेला शैक्षणिक साहित्य दिले जाईल. त्यात कोठेही कमी पडणार नाही, असे आमदार जयंत आसगावकर म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक श्री.शाहू हायस्कूलचे प्राचार्य गणपतराव तावरे यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष नागनाथ केंगल, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू व सिकंदर शेख, सचिव संदीप जगताप, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, अरुण थोरात, विजय कचरे, सचिन तुरगाडे, बारामती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव वीरधवल गाडे, बारामती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव बुरुंगले,
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस स्वरूप रूपनवर, दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांच्यासह बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच विविध संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930