नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या अध्यक्षपदी प्राचार्य डी.एस.देसाई, उपाध्यक्षपदी महावीर पाटील तर सचिवपदी सचिन देसाई यांची निवड* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या अध्यक्षपदी प्राचार्य डी.एस.देसाई, उपाध्यक्षपदी महावीर पाटील तर सचिवपदी सचिन देसाई यांची निवड*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या अध्यक्षपदी प्राचार्य डी.एस.देसाई, उपाध्यक्षपदी महावीर पाटील तर सचिवपदी सचिन देसाई यांची निवड*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्दात हेतूने ‘मिणचे खुर्द शिक्षण मंच’ची स्थापना करण्यात आली असून शिक्षण मंचच्या अध्यक्षपदी भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.डी.एस.देसाई यांची, उपाध्यक्षपदी दौलत विद्यामंदिर, मडिलगे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री.महावीर पाटील यांची तर सचिवपदी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री.सचिन देसाई यांची निवड करण्यात आली.
केंद्रीय शाळा, मिणचे खुर्द येथे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व सेवानिवृत्त बांधवांची सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत गावात पुढील काळामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याच्या हेतू ‘मिणचे खुर्द शिक्षण मंच’ ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये लेखक प्रा. सुनील देसाई, प्रा. प्रकाश देसाई, सुभाष सोकासणे व आदर्श शिक्षिका शितल देसाई यांचा गौरव करण्यात आला.
गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनाही या मंचामध्ये सहभागी करुन घेऊन शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या शिक्षण मंचाची आदर्श आचारसंहिता व नियोजन करण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांना व युवकांना शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा व निकोप वातावरण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विधायक कार्यक्रम हाती घेण्याचे व त्यासाठी आवश्यक आर्थिक मदत जमा करण्याचे ठरले.
या शिक्षण मंचाच्या माध्यमातून शैक्षणिक विकासाबरोबर सामाजिक सलोखा देखील साध्य होईल असा मनोदय अनेकांनी व्यक्त केला. यावेळी निवडलेल्या कार्यकारी मंडळाचा कालावधी एक वर्षाचा राहील असे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी श्री.बी.एम. कासार, सर्जेराव देसाई, आर.डी. देसाई, शिवाजी देसाई, व्ही. एस. देसाई, शरद देसाई, विमल नलवडे, पी.एल. मौर्य, आर.जी. कांबळे, मनोहर देसाई, अरुण नलवडे, अर्जुन नलवडे, संजयकुमार देसाई, किशोर कासार, सुनिल पाटील, बाळासो कांबळे, चंद्रकांत खेगडे आदी शिक्षणप्रेमी उपस्थित होते. शेवटी आभार उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930