नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *श्री.प्रकाश कुलकर्णी यांची वाटचाल संघर्षातून सन्मानाकडे : भरत रसाळे* *सेवानिवृत्तीबद्दल मुख्याध्यापक श्री.प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ संपन्न* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*श्री.प्रकाश कुलकर्णी यांची वाटचाल संघर्षातून सन्मानाकडे : भरत रसाळे* *सेवानिवृत्तीबद्दल मुख्याध्यापक श्री.प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ संपन्न*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*श्री.प्रकाश कुलकर्णी यांची वाटचाल संघर्षातून सन्मानाकडे : भरत रसाळे*

*सेवानिवृत्तीबद्दल मुख्याध्यापक श्री.प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ संपन्न*

गारगोटी प्रतिनिधी
नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश गंगाधर कुलकर्णी यांच्या संघर्षमय प्रवासाकडे पाहिल्यास त्यांची वाटचाल संघर्षातून सन्मानाकडे अशी झाली आहे, असे उदगार महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शाळा समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी काढले.
भुदरगड शिक्षण संस्था संचलित नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश गंगाधर कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात श्री.भरत रसाळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भुदरगड शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.गणेश मुंगळे होते.
यावेळी बोलताना श्री.रसाळे म्हणाले, श्री. कुलकर्णी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळेल ते काम केले. हा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. त्यांनी नूतन मराठी शाळा या शिक्षण संकुलाची चांगली सेवा केली.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना ॲड.गणेश मुंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबर समाजाला घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. समाजाने शिक्षकांच्या कामाची दखल घ्यायला हवी. मुख्याध्यापक श्री.प्रकाश कुलकर्णी यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम केले. त्यांनी यापुढे समाज शिक्षकाची भूमिका बजावावी.
गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे म्हणाले, मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांप्रती निष्ठेने काम केले. त्यामुळेच शाळेचा प्रभारी चार्ज असतानाही सहकाऱ्यांना विश्वास देत शाळा समाजापर्यंत पोहचविण्याचे काम केले.
यावेळी सेवानिवृत्ती बद्दल मुख्याध्यापक श्री.प्रकाश कुलकर्णी यांचा खाजगी प्राथमिक शाळा समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या उपशिक्षणाधिकारी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचा सत्कार भुदरगड शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.गणेश मुंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवडीबद्दल श्री.एस.डी.कासार यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. प्रकाश गंगाधर कुलकर्णी म्हणाले, आयुष्यात शिक्षण घेताना आणि नंतरही अनेकदा संघर्ष करावा लागला. पण अनेकांनी सहकार्य केले. अशा सहकार्य करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी केंद्रप्रमुख संजय कुकडे, प्रताप माने (सातारा), मडिलगे हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ.ए.एम.पाटील, गारगोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, दत्ता पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी भुदरगड शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. शिवाजी चोरगे, दिपक शहा, आनंदराव जाधव, कडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.आर.वाय.देसाई, नाधवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा खोत, श्री.सुर्यकांत बरगे, श्री.सर्जेराव नाईक, श्री.आप्पासाहेब वागरे, श्री. प्रताप माने, श्री. महादेव खुडे. श्री.दीपक चिकने, श्री.शेंडे, शिवाजी वळिवडे, सौ. पाटील, दिपक मोरे, सौ. पदमजा पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री. एच. बी. देसाई यांनी आभार शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका सौ.भारती शिंदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. आर. डी. पोवार व श्री. आर. पी. गव्हाणकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930