नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करावी : आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण उपसंचालक अहिरे यांना आदेश* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करावी : आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण उपसंचालक अहिरे यांना आदेश*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करावी : आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण उपसंचालक अहिरे यांना आदेश*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
शासनाने शालार्थ आयडी मिळण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्याचे पत्र काढले आहे. आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबतीत तातडीने कार्यवाही करून टप्पा अनुदानावरील शिक्षकांना शालार्थ आयडी द्यावे. येत्या आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना दिले.
आमदार आसगावकर यांनी पुणे दौऱ्यावर असताना पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित शालार्थ आयडीचा आढावा घेतला. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शालार्थ आयडीचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यासाठी आपण शासन स्तरावर शालार्थ आयडी मिळण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करून घेतल्या. आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यात लक्ष घालून शालार्थ आयडीचा प्रश्न मार्गी लावावा.
उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्वतः लक्ष घालून येत्या आठ दिवसात शिक्षकांना शालार्थ आयडी देणार असल्याचे सांगितले.
सोलापूरचे शिक्षणाधिकारी श्री.फडके हे शिक्षकांची दिशाभूल करत असून एफआरआय नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी श्री. अहिरे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतीत आम्ही फडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे श्री. अहिरे यांनी सांगितले. या बैठकीत आमदार जयंत आसगावकर यांनी अनेक शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न देखील मार्गी लावले.
यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे विभागीय बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर यांची भेट घेऊन शालार्थ आयडीबाबत चर्चा केली त्यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली. यावेळी सहायक शिक्षण संचालक सौ.परीहार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिकच्या सौ.गायकवाड,
दोन्ही वेतन पथक अधिक्षक यांच्यासह शिवाजी खांडेकर, शिक्षक नेते आण्णासाहेब गायकवाड, श्रावण बिराजदार, मधुकर नाईक, श्री.बेहरे, श्री.जानकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31