नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *पडखंबे येथे पर्यावरणमित्र अवधूत पाटील व वनविभागाकडून सर्पविषयक प्रबोधन समारंभ संपन्न* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*पडखंबे येथे पर्यावरणमित्र अवधूत पाटील व वनविभागाकडून सर्पविषयक प्रबोधन समारंभ संपन्न*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*पडखंबे येथे पर्यावरणमित्र अवधूत पाटील व वनविभागाकडून सर्पविषयक प्रबोधन समारंभ संपन्न*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पडखंबे (ता.भुदरगड) येथे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरणमित्र अवधूत पाटील व वनविभाग भुदरगड यांच्याकडून सर्पविषयक प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यामंदिर, पडखंबे या शाळेत वन्यजीव विशेषतः सर्पविषयक प्रबोधनाचा कार्यक्रम पर्यावरणमित्र अवधुत पाटील व वनविभाग भुदरगड यांच्या वतीने घेण्यात आला. सदर उपक्रमात पडखंबे बरोबरच रावणवाडी, खोतवाडी, वरपेवाडी, न्हाव्याचीवाडी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी ‘वन्यजीव जतन व संवर्धन’ या विषयावर बोलताना पर्यावरणमित्र अवधूत पाटील म्हणाले, निसर्गचक्र नित्यनियमाने सुरू असते, त्यात कसलीही बाधा येत नाही पण अलीकडील काही वर्षांमध्ये मानवाने आपल्या स्वार्थी हेतूपायी जंगली प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्याने मानव व जंगली प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होत आहेत. ‘जीवो जीवश्य जीवनम’ हे सुत्रच विसरले जात असल्याने अन्न साखळीतील दुवे हरवत चालले आहेत. आपल्या सोबत जगणारे आपले सहचर प्राणी व मानव यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी निसर्ग ही आपली माता समजून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवला पाहिजे, निसर्गाचे चक्र विस्कटू न देता आपण आपले जीवन जगले पाहिजे अन्यथा भविष्यात दूरगामी परिणाम भोगावे लागणार यात शंका नाही.
सर्पविषयक समज -गैरसमज, श्रद्धा -अंधश्रद्धा, साप हाताळण्याच्या पद्धती, विषारी बिनविषारी सापांचे प्रकार, जाती प्रजाती, सापांची उत्क्रांती, शरीररचना, रंग, कात, डोळे, श्रवण, गंध, वसतिस्थान, प्रजनन, मिलनकाळ, सर्पदंश, प्रथमोपचार, सापांचे पर्यावरणातील स्थान, महत्व याची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सर्पविषयक चळवळ गतिमान होऊन, सर्पहत्येवर काही अंशी का असेना आळा बसणार आहे. सदर शाळेतील उपक्रमात पर्यावरणमित्र अवधुत पाटील यांच्यासह वनविभाग भुदरगड स्टाफचे आशिष चाळसकर, बळवंत शिंदे, दशरथ मोरबाळे, मयुरी पाटील, पडखंबे शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी धारपवार, वरपेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा यादव, खोतवाडी शाळेचे मुख्याध्यापक अभिषेक बागडी, विजय रामाणे, बाळासो पंढरे, सविता रायजादे, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले. स्वागत व प्रास्ताविक विजय कोरवी यांनी तर आभार चंद्रकांत शेटके यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930