नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वर्ल्ड फॉर नेचर टीमच्या वतीने मेघोली पैकी धनगरवाड्यावर सर्पजनजागृती कार्यशाळा व जंगली जनावरांपासून संरक्षणाबद्दल मार्गदर्शन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वर्ल्ड फॉर नेचर टीमच्या वतीने मेघोली पैकी धनगरवाड्यावर सर्पजनजागृती कार्यशाळा व जंगली जनावरांपासून संरक्षणाबद्दल मार्गदर्शन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वर्ल्ड फॉर नेचर टीमच्या वतीने मेघोली पैकी धनगरवाड्यावर सर्पजनजागृती कार्यशाळा व जंगली जनावरांपासून संरक्षणाबद्दल मार्गदर्शन*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
वर्ल्ड फॉर नेचर टीमच्या वतीने मेघोली पैकी धनगरवाडा (ता.भुदरगड) येथे सर्पजनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. तसेच जंगली जनावरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम, घनदाट जंगलात असलेल्या या धनगरवाड्यातील व्यक्तीला दुर्दैवाने साप चावलाच तर चादरीची झोळी करून अंधारवस्ती, जंगलातून पेशंटला दवाखान्यात न्यावे लागते. दवाखाना, प्राथमिक वैद्यकीय सुविधा तर कित्येक किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे सर्पजनजागृती अभियान राबवून प्रबोधन करण्यात आले. तसेच जंगली जनावरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना या महत्वाच्या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
भुदरगड तालुक्यातील मेघोली पैकी धनगरवाडा हा सह्याद्रीच्या कुशीतल्या दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरची माणसं, जी कायमच स्वतःच्या गरिबीशी, मागासलेपणाशी व एकंदरीत आपल्या आयुष्याशी लढत असतात, संघर्ष करत असतात. त्यांच राहणीमान म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला वेदनेची जाणीव करून देणारं जीवन, जिथं त्या वेदनेवर फुंकर घालणे पण सहज सोपे नाही.
शेतात राबराब राबणारे कष्टाळू हात असू देत नाहीतर जनावरं सांभाळताना केलेली जीवापाड कसरत असू दे. दिवसरात्र जंगली प्राण्यांचा, विषारी सापांचा धोका असतोच.
डोंगराळ, दुर्गम, घनदाट जंगलात असलेल्या या धनगरवाड्यातील कष्टकरी व दिवसभर रानात राब राब राबणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे. सापाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज व अज्ञान यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये व त्याचवेळी निसर्गातील, जैवसाखळीतील या महत्वाच्या घटकाला नाहक मारले जाऊ नये म्हणूनच ‘सर्पजनजागृती अभियान’ राबविण्यात आले.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे शुभम पांडे, अभिजीत वाघमोडे, अनुप शेलार, श्रेयस पट्टणशेट्टी, जोतिबा जोशीलकर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930