नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड या नामांकित शाळेस प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना नामदार संजय बनसोडे म्हणाले, शिक्षक व शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करू. प्रसंगी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी झटत असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, शाळा समितीचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, को.जी.मा.शी.चे चेअरमन बाळ डेळेकर, आजी माजी विद्यार्थी, पालक,शिक्षक, कर्मचारी यांचे याकामी प्रोत्साहन लाभले. प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस.पी.पाटील, पी.एस.पाटील, प्रशांत डेळेकर, श्रीकृष्ण बोंडगे यांनी स्वीकारला. यावेळी दत्तात्रय मुद्देवाड ,बालाजी सुवर्णकार, पंडित पांचाळ, बसवराज स्वामी, विजयकुमार राव जाधव, लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष दिपाली आवटे, मदन धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930