नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त हमिदवाडा येथे स्केटिंग प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त हमिदवाडा येथे स्केटिंग प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त हमिदवाडा येथे स्केटिंग प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, गारगोटी यांच्यामार्फत आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, सदाशिवनगर हमिदवाडा (ता.कागल) येथे शालेय उपक्रमा अंतर्गत स्केटिंग या ऑलम्पिक व शालेय खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. आर. घोरपडे यांच्या हस्ते स्केटिंगचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ.घोरपडे म्हणाल्या, शालेय जीवनात खेळाला अत्यंत महत्व आहे. त्याचबरोबर विविध कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने अशा प्रकारचे उपक्रम खूप महत्त्वाचे असतात. स्पर्धेच्या युगामध्ये वेग व वेळ यांच्याशी सांगड घालायची असेल तर स्केटिंग सारखा दुसरा खेळ नाही. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू करत आहोत.
प्रास्ताविक सौ. एस. एस. खेडगे यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. एस.एन. लोकरे यांनी केले. या कार्यक्रमास ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक इंद्रजीत मराठे, शाळेच्या शिक्षका सौ. एस. पी. मलाडे त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आभार सौ. पी. आर. देवडकर यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031