नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी मागणीसाठी आम.आबिटकर यांना निवेदन : वेतनश्रेणीसाठी प्रयत्न करण्याचे आ.आबिटकर यांचे आश्वासन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी मागणीसाठी आम.आबिटकर यांना निवेदन : वेतनश्रेणीसाठी प्रयत्न करण्याचे आ.आबिटकर यांचे आश्वासन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी मागणीसाठी आम.आबिटकर यांना निवेदन : वेतनश्रेणीसाठी प्रयत्न करण्याचे आ.आबिटकर यांचे आश्वासन

गारगोटी प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहाचे अधिक्षक व अधिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने राधानगरी मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन वेतनश्रेणी लागू करणेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आम.आबिटकर यांनी दिले.
सामाजिक न्याय विभागातंर्गत राज्यात २३८८ अनुदानित वसतिगृहे १०० टक्के अनुदान तत्वावर कार्यरत आहेत. शासनाची ही सर्वात जुनी योजना असून त्यावर काम करणारे ८९०४ कर्मचारी मात्र मानधनावर कार्यरत आहेत. गेल्या ३० वर्षापासून अनुदानित वसतिगृह कर्मचारी २४ तास अल्प मानधनावर आपली सेवा बजावत आहेत. त्यानंतर सुरू झालेल्या अनुसूचित जमातीच्या आश्रमशाळेचे व विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच सामाजिक न्याय विभागातंर्गत चालविण्याकरीता येणाऱ्या अंध, अपंग, मुकबधीर शाळेच्या वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळते. ०९ एप्रिल २०१३ रोजी वसतिगृह कर्मचाऱ्याना वेतन श्रेणीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी जाऊन देखील वेतनश्रेणीत सामावून घेण्यात आले नाही. २१ मार्च २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान काम व समान वेतन या कायद्याअंतर्गत अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्याना वेतनश्रेणीची मागणी करून देखील न्याय मिळाला नाही.
अनुदानित मागासवर्गिय वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी किवा समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे. या संदर्भात अनुदानित वसतिगृह अधिक्षक, अधिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचेसोबत बैठक आयोजित करून वसतिगृह कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.
यावेळी शिष्टमंडळात वसतिगृह संस्थाचालक संघाचे नामदेवराव कांबळे, मिलिंद पांगिरेकर, कर्मचारी संघटनेचे साताप्पा कांबळे, पी. एन. कांबळे, श्री.संतोष पत्ताडे, श्री.प्रसाद कांबळे, श्री.बाळासाहेब कांबळे, श्री.चंद्रकांत कांबळे, श्री बाळासाहेब कविळे, श्री.मिलिंद कांबळे, श्री.सदाशिव हेगडे, श्री.विश्वजीत घाटगे, श्री.संदीप पाटील, सौ.विद्या लंबे, श्री.तुकाराम भोसले, श्री.अनिल देसाई, श्री.सुचित कांबळे, कु. प्रज्ञा कांबळे, रणजीत लंबे, सौ.गीता शिंदे ,श्रीमती भारती शिंगाडे आदी सहभागी झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031