नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी लागू असणारे सर्व भत्ते इचलकरंजी शहरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळास ग्वाही – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी लागू असणारे सर्व भत्ते इचलकरंजी शहरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळास ग्वाही

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी लागू असणारे सर्व भत्ते इचलकरंजी शहरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार प्रकाश आवाडे
इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळास ग्वाही
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र घोषित झाल्यामुळे शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय आस्थापना येथे कार्यरत सर्व शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांचे साठी लागू असणारा घरभाडे भत्ता व विशेष शहर भत्ता या बाबी लागू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळास दिली. कर्मचाऱ्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली.
इचलकरंजी शहराचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश झाला आहे. परंतू
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना अद्यापही नगरपालिका क्षेत्रासाठी लागू असणाराच घरभाडे भत्ता मिळतो. कर्मचारी यांना शहरभत्ताही मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सेवा सुविधा पासून वंचित रहावे लागते त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाबही शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिली .
सदर शिष्टमंडळात इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्रा.शेखर शहा, हातकणंगले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.पी.डी.शिंदे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपर्कप्रमुख श्री. अशोक हुबळे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर श्री. इरफान अन्सारी, इचलकरंजी महानगरपालिका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष श्री अशोक निंबाळकर, हातकणंगले तालुका महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष श्री. वि.ह.सपाटे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रशांत गुरव, मुख्याध्यापक श्री.शंकर पोवार आदीसह शिक्षक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930