नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून B+ मानांकन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून B+ मानांकन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून B+ मानांकन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक पिअर टिमने B+ मानांकन दर्जा दिला आहे.
नॅक पिअर टिमने दि. १० व ११ ऑक्टोबर रोजी भेट देवून आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे मूल्यांकन केले होते. या समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. राजेंद्रसिंह यादव (सेवानिवृत्त प्राध्यापक, कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र), सदस्य समन्वयक प्रोफेसर डॉ.नुर अहाँ गनीहार (सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड), सदस्य प्राचार्य डॉ.हरे कृष्ण मंडल (प्राचार्य, गोवर्धन हिंदू कॉलेज, कलकत्ता) हे होते.
या समितीने संपूर्ण महाविद्यालयाचे मूल्यांकन करून समितीचा अहवाल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पी. एस. देसाई यांच्याकडे सुपुर्द केला. नॅककडून B+ मानांकन प्राप्त झाल्याचे नुकतेच ऑनलाइन जाहिर केले आहे. महाविद्यालयाचे हे तिसरे मानांकन असून, यामध्ये CGPA – 2.63 इतका प्राप्त झाला आहे. NAAC ची तिसरी सायकल पूर्ण करून मानांकन प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठातील हे पहिले बीएड महाविद्यालय आहे. यापूर्वी २००४ साली पहिले मानांकन यामध्ये ‘B’++’ही’ ग्रेड मिळाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये दुसऱ्या NAAC मानांकनामध्ये ‘B’ ग्रेड (OCGPA – 2.19) मिळाली होती. NAAC तिसऱ्या सायकलमध्ये मूल्यांकनात महाविद्यालयाने प्रगती केली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री, आमदार श्री.सतेज उर्फ बंटी पाटील, मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, विश्वस्त पल्लवीताई कोरगांवकर, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. ए. एम. चौगले, संचालक प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील याचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पी. एस. देसाई, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ. पी. बी. दराडे, प्रा. डॉ. आर. के. शेळके, प्रा. एस. आर. बाड, प्रा. एन. व्ही. पाटील, गुरुनाथ कांबळे, संग्राम शिवुडकर यांचे सहकार्य लाभले.‌

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930