नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी हायस्कूलच्या राम गव्हाणकर यांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी हायस्कूलच्या राम गव्हाणकर यांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी हायस्कूलच्या राम गव्हाणकर यांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख श्री.राम गव्हाणकर यांना प्रतिष्ठेचा ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलाच्या मैदानावर आयोजित श्री.राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९० साली स्थापन झालेल्या भुदरगड शिक्षण संस्थेने भुदरगड तालुक्यात एक प्राथमिक शाळा व चार माध्यमिक शाळा सुरू केल्या. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, ग्रामीण बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भास्कर शंकर ठाकूर यांच्या पुढाकाराने संस्थेची स्थापना झाली.
श्री.गव्हाणकर हे गारगोटी हायस्कूलमध्ये गेली ३० वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षे गणित हा विषय शिकवल्यानंतर शाळेतील विद्यार्थी व तुकड्यांची संख्या वाढल्यामुळे मराठी शिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी हायस्कूल ही शाळा शिस्त, गुणवत्ता, दर्जा, सुसंस्कार यासाठी नावाजलेली आहे. शाळेच्या नावलौकिकात मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यात श्री. गव्हाणकर यांचाही वाटा आहे. शाळेच्या सुरुवातीपासून अनेक वर्षे सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून काम केले. शाळेचा दैनंदिन परिपाठ तालासुरात वाद्यांसह नियमित घेतला जातो. कोल्हापूर आकाशवाणीवरून ‘बालजगत’ या कार्यक्रमात गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सलग सहा वर्षे सहभागी होण्याची संधीही त्यांच्यामुळे मिळाली.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त गारगोटी शहरातून पारंपारिक वेशभूषेत निघणारी वारकरी दिंडी हे गारगोटीचे भूषण आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जसे कार्यरत आहेत तसे कलाक्षेत्रात ही बरेच पुढे गेलेले आहेत. शाळेतील परीक्षा, क्रीडा, सहल असे अनेक विभाग सांभाळतानाच विद्यार्थ्यांना योग शिक्षण देण्याचे कामही ते पाहतात. शाळेच्या विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस परीक्षेत राज्यात प्रथम येण्यापासून ते शिष्यवृत्ती सारख्या इतरही अनेक स्पर्धा परीक्षा, कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.
कोरोना कालखंडात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले. शिक्षक म्हणून वाचनाची आवड जोपासतानाच ‘ज्ञानप्रबोधिनी, गारगोटी’ या संस्थेच्या माध्यमातून आजरा तालुक्यातील महागोंड या आपल्या मूळ गावी ग्रंथालयही सुरू केले आहे. सध्या १५ हजाराहून अधिक ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर भुदरगड,आजरा आणि चंदगड या तिन्ही तालुक्यात ग्रंथालयांना सुरुवातीपासून मार्गदर्शन व कामकाजातील अनेक बाबींबाबत त्यांनी सहकार्य केले आहे.
त्यांच्या पणजोबांपासून घरात सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसाही त्यांनी जोपासला आहे. गायन व तबला संगीत विशारद असलेल्या श्री.गव्हाणकर यांनी गारगोटी येथे ‘स्वरधारा संगीत विद्यालय’ सुरु करुन त्या माध्यमातून कुटूंबीय व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक जिल्ह्यात विविध ठिकाणी सांगितिक कार्यक्रमही सादर केले आहेत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर द.ना.गव्हाणकर यांचे ते वारस आहेत. सध्याचे आघाडीचे युवा संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉ.सलील कुलकर्णी यांच्या सुगम संगीत कार्यशाळेतही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ई टीव्ही मराठी ने आयोजित केलेल्या भजन स्पर्धेत सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र म्युझिक ओलंपियाड संस्थेने घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या संगीत परीक्षेत गारगोटी हायस्कूलची विद्यार्थिनी राज्यात तिसऱ्या क्रमांकाने यशस्वी झाली आहे.
सहकार आणि सामाजिक क्षेत्रात ही अनेक संस्थांच्या कार्यामध्ये श्री.गव्हाणकर यांचा सहभाग आहे. भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघ, भुदरगड येथे सचिव पदावर आहेत. विश्व मराठी परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रवचन-कीर्तन वर्गाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. २१ जून योगदिनानिमित्त आयोजित वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १ लाख योगसाधकांमध्ये त्यांचा सहभाग आहे. विविध वृतपत्रात वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असलेल्या अशा या सर्व स्पर्शी व्यक्तिमत्त्वाला या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930