नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर जिल्ह्यात फटाके मुक्त व प्रदुषण मुक्त दिपावली साजरी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात फटाके मुक्त व प्रदुषण मुक्त दिपावली साजरी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर जिल्ह्यात फटाके मुक्त व प्रदुषण मुक्त दिपावली साजरी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीचा दिपावली सण वेगळया पध्दतीने व उपक्रमांच्या व्दारे साजरा करण्याबरोबर फटाके मुक्त व प्रदुषण मुक्त दिपावली साजरी करावी. यासाठी शाळास्तरावर कार्यवाही करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील परिपत्रकाद्वारे केले आहे.
दिपावली हा सण आपल्या देशात तसेच परदेशातही भारतीय बांधवांच्या वतीने खूप प्रेमाने, आनंदाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. दिपावली हा सण प्रामुख्याने विद्युत रोषणाईचा सण मानला जातो. तसेच या सणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे ध्वनी व हवा प्रदूषण होवून पर्यावरणावर मोठा परिणाम होतो तसेच मानवी जीवनावर व पशु पक्षी यांच्या जीवनावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. या सर्व धोक्यामुळे फटाकेमुक्त दिपावली साजरी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच या दीपावली सुट्टीत पुस्तक वाचनाची आवड निर्माण होईल असे उपक्रम राबवावेत.
शाळा स्तरावर या उपक्रमांची सुरुवात झाली तर देशाची भावी पिढी पर्यावरण व मानवी आरोग्याविषयी अधिक जागृत होण्यास मदत होईल. शिवाय वाचन संस्कृतीचा विस्तार होण्यास मदत होईल. त्याच बरोबर ‘फटाक्यांची रोषणाई क्षणभर : ज्ञानाची रोषणाई आयुष्यभर !” हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचेल.
सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्यावे
१) पर्यावरणाचा -हास कमी होण्यासाठी फटाकेमुक्त दिपावली हा उपक्रम राबवावा. परिसरातील नागरिकांना याबाबत आवाहन करावे. २) फटाकेमुक्त दिपावलीमुळे बचत होणाऱ्या पैश्यातून वर्गस्तरीय व शाळास्तरीय ग्रंथालय निर्माण करता येईल. ३) या दिपावली सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना घरी किमान २० पुस्ताकांचे वाचनालय सुरु करणेबाबत आवाहन व मार्गदर्शन करावे तसेच वाचनाची आवड, ज्ञान वृध्दींगत होणेसाठी शाळास्तरावर वर्तमानपत्रे, मासिके उपलब्ध करुन द्यावीत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या घरी व शाळेमध्ये समृध्द वाचनालय निर्माण होतील. पैश्याच्या बचतीची सवय लागेल व घेतलेल्या पुस्तकांच्या वाचनातून मुलांचा भावनिक, बौध्दिक व सामाजिक विकास होईल. या सर्वातून वाचन संस्कृती बरोबर त्यांची वाचन गती व अकलन क्षमतेमध्ये वृध्दी होईल. हा उपक्रम उत्कृष्ट प्रकारे राबविण्यासाठी शाळास्तरावर नियोजन करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930