नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , किल्ले भुदरगड दीपोत्सवाने उजळला… – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

किल्ले भुदरगड दीपोत्सवाने उजळला…

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

किल्ले भुदरगड दीपोत्सवाने उजळला…

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, भुदरगड
आपल्या लख्ख प्रकाशाने आसमंत उजळून टाकणारा सण म्हणजे दीपावली. आपण हा सण आपापल्या घरी झगमगाटात साजरा करतो पण ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करुन संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच शिवछत्रपतींनी घडवलेले अनेक गडकोट किल्ले मात्र दिपावलीच्या काळात अंधारात असतात. नेमकं हेच हेरुन पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबीय, कोरिवडे गावचे भानुदास व श्रीधर कसेकर बंधू व मित्रमंडळी गेली दहा वर्षापासून किल्ले भुदरगडवरील शिवमंदिर व राजसदर या ठिकाणी दीपोत्सव उत्साहाने साजरा करतात.
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही किल्ले भुदरगडवर दीपोत्सव सोहळ्याचे नियोजन झाले. एक पणती छत्रपती शिवरायांच्या चरणी, एक पणती हिंदवी स्वराज्याच्या चरणी हि संकल्पना अंतःकरणात साठवत किल्ले भुदरगडवरील शिवमंदिर व राजसदरेवर दीपोत्सव सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पाडायचा ह्या हेतूने संपूर्ण गडावरील प्लास्टिक एकत्र करुन ते गडावरुन खाली नेण्यात आले. ऐतिहासिक वास्तू, तटबंदीवरील उगवलेले तण काढण्याबरोबरच पावसाळ्यात वृक्षारोपण केलेल्या वडाच्या झाडांना पाणी देण्यात आले. शिवमंदिर, राजसदरेवर रांगोळी काढण्याची जबाबदारी जान्हवी पाटील, मिथाली पाटील यांनी पेलली. रांगोळीचे उत्कृष्ट नमुने, त्यासाठीची पूर्वतयारी, साहित्याची जमवाजमव अगदी तंतोतंत काटेकोरपणे पार पडली.
पावसाचे तुषार, दाटलेले धुके याची तमा न बाळगता मावळ्यांनी शिवमंदिर, राजसदर परिसर रांगोळ्या, भगव्या पताका, आकाश कंदील, फुलांच्या पाकळ्या, माळांनी, झावळ्यांनी सजवला. शिवमंदिरात भानुदास कसेकर यांनी शिवगारदाने दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात केली. श्री. सुखदेव मगदूम मडीलगे खुर्द यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवमंदिर परिसरात तानाजी पाटील, निवृत्ती पाटील यांनी स्मशालज्योति प्रज्वलित केली. स्मशालज्योतिच्या प्रकाशात अक्खा परिसर न्हाऊन निघाला. पणत्या, मेणबत्या दोन्ही वास्तूमध्ये प्रज्वलित करण्यात आल्या. छत्रपतींच्या जयघोषाने वातावरण शिवमय, मंगलमय होऊन आसमंत दणाणून गेले. तेजोमय दीपोत्सवात श्रीधर कसेकर, समीर पाटील, शुभम रायकर, अथर्व पाटील, राजवर्धन पाटील, आर्यन पाटील, किशोर नार्वेकर, साहिल पाटील, यश पाटील, सुरज पाटील, ज्ञानदीप पाटील, निखिल पाटील, जगदीश मिसाळे, शंभूराजे पाटील, क्षितिज पाटील आदींनी सहभाग घेतला. मिथाली पाटील हिचे शिवगारद व जान्हवी पाटील हिच्या शिवप्रेरणा मंत्राने दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

November 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930