नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विद्यार्थ्यांनी दहावीनंतर शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे : डॉ.विलास पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

विद्यार्थ्यांनी दहावीनंतर शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे : डॉ.विलास पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

विद्यार्थ्यांनी दहावीनंतर शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे : डॉ.विलास पाटील
गारगोटीत ‘करिअर मार्गदर्शन शिबिर’ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी शासनाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, असे आवाहन ‘सारथी’चे कार्यकारी अधिकारी डॉ.विलास पाटील यांनी केले.
श्री.इंजूबाई सांस्कृतिक हॉल, गारगोटी येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), कोल्हापूरच्या वतीने आयोजित दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘करिअर मार्गदर्शन शिबिर’प्रसंगी डॉ.विलास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे होते.
यावेळी बोलताना डॉ.विलास पाटील म्हणाले, दहावीनंतर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत पण संधीचा फायदा घेण्यासाठी तयारी करायला हवी. अभ्यासाची कौशल्य आत्मसात करायला हवी. केवळ गुण म्हणजे गुणवत्ता नाही तर गुणाबरोबर सदगुणही हवेत.
डॉ. पाटील यांनी शासनाच्या सारथी, बार्टी, महाज्योती, मार्टी, आर्टी व अमृत या संस्थामार्फत संशोधन, परदेशी जाण्यापासून, आयआयटी, मेडिकल शिक्षणाच्या संधी तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी मदत केली जाते. यासह दहावीनंतर अभ्यासाची कोणती कौशल्ये अंगी बाळगावीत याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ.विलास पाटील यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सारथीचे कार्यालयीन सहाय्यक राहुल कोरे, विशेष शिक्षक जे.ए.मुल्ला, सुरेश पाटील, तानाजी पाटील, कोमल कांबळे यांच्यासह गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, श्री.शाहू कुमार भवन, श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, व श्री.मौनी महाराज (बनारस) हायस्कूल आदी शाळातील सुमारे ५०० विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी आभार श्री.सहदेव सावंत यांनी सूत्रसंचालन श्री.युवराज शिगावकर यांनी केले.

फोटो : गारगोटी येथे ‘सारथी’च्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिरप्रसंगी बोलताना डॉ.विलास पाटील, सोबत गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर आदी
२) ‘सारथी’चे कार्यकारी अधिकारी डॉ.विलास पाटील यांचे स्वागत करताना गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे सोबत प्राचार्य मिलिंद पांगिरेकर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31