नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.संजय नाईक व श्री.अमृत देसाई यांनी समर्पित भावनेने सेवा केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.संजय नाईक व श्री.अमृत देसाई यांनी समर्पित भावनेने सेवा केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.संजय नाईक व श्री.अमृत देसाई यांनी समर्पित भावनेने सेवा केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांचा वाटा मोलाचा असून श्री.संजय शांताराम नाईक व श्री.अमृत मारुती देसाई यांनी समर्पित भावनेने सेवा केली, असे गौरवोदगार गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी काढले.
भुदरगड शिक्षण संस्था, गारगोटी संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील सहा.शिक्षक श्री.संजय नाईक व वरिष्ठ लिपीक श्री.अमृत देसाई यांच्या सेवापुर्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मेंगाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी भुदरगड शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ॲड.गणेश मुंगळे होते.
यावेळी श्री.संजय नाईक व श्री.अमृत देसाई यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी कु.राजेश्वरी देसाई, कु.ऋग्वेद मोरसे, गोकुळचे संचालक श्री.नंदकुमार ढेंगे, प्रा. शिवाजीराव चोरगे, डॉ.ए.एम.पाटील, प्रा.शेखर देसाई, श्री.वजीर मकानदार, श्री.एन.एस.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक श्री.दिपक शहा, श्री.आनंदराव जाधव, श्रीमती सुवर्णा भास्कर ठाकूर, श्रीमती गीता संभाजीराव पाटील, श्री.टी.एम.देसाई, मुख्याध्यापक आर.डी.पोवार, बी.डी.कांबळे, डॉ. एस.बी. शिंदे, श्री.एल.जी.हवालदार, श्री.आर.वाय.देसाई, युवा नेते वीरेंद्र देसाई, सर्जेराव मोरे, श्री.प्रकाश कुलकर्णी, श्री.मांडे सौ. विजया अमृत देसाई, सौ. निलम संजय नाईक यांच्यासह संस्थांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी, मानपत्र वाचन श्री.आर.पी. गव्हाणकर व श्री. विजय स्मार्त यांनी, आभार श्री.बी.ए.डावरे यांनी तर सुत्रसंचलन श्री. युवराज शिगांवकर यांनी केले.

शिक्षक आमदारांच्या हस्ते सत्कार
पुणे विभागीय शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते श्री.संजय नाईक व श्री.अमृत देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31