‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने गारगोटी दुमदुमली! गारगोटी हायस्कूलची भव्य वारकरी दिंडी : नयनरम्य रिंगण सोहळ्याने वेधले नागरिकांचे लक्ष
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने गारगोटी दुमदुमली! गारगोटी हायस्कूलची भव्य वारकरी दिंडी : नयनरम्य रिंगण सोहळ्याने वेधले नागरिकांचे लक्ष

ज्ञानप्रतिनिधी प्रतिनिधी, गारगोटी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य व उत्साहपूर्ण वारकरी दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि संतांच्या वेशातील चिमुकल्यांच्या सहभागाने संपूर्ण गारगोटी शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. दिंडीस पालक वर्गासह समाजातील सर्व घटकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पारंपरिक पद्धतीने सजवलेला रथ आणि त्यात विराजमान झालेले विठ्ठल, रखुमाई व विविध संतांच्या वेशातील विद्यार्थी हे या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. हुतात्मा क्रांती चौक, बाजारपेठ, महादेव मंदिर चौक, आबिटकर कॉम्प्लेक्स आणि श्री. साई मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व नयनरम्य रिंगण सोहळा सादर केला. हा सोहळा पाहण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. दिंडीचा समारोप विठ्ठल मंदिरातील भावपूर्ण महाआरतीने झाला.
दिंडीचा शुभारंभ ह.भ.प. राम कळंबेकर व ह.भ.प. दत्तात्रय घुंगुरकर यांच्या हस्ते झाला. बिद्री कारखान्याचे संचालक श्री. राहुल देसाई, युवा नेते प्रतापसिंह प्रकाश आबिटकर, सरपंच श्री. प्रकाश वास्कर, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. बजरंग कुरळे, भाजयुमो प्रदेश सचिव अल्केश कांदळकर आणि शिवसेना शहरप्रमुख रणधीर शिंदे आदी मान्यवरांनी दिंडीचे पूजन करून दर्शन घेतले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विठ्ठल भजनी मंडळाने सहभागी विद्यार्थ्यांना फराळ वाटप केले. त्रिमूर्ती फर्निचर मॉल यांनी विद्यार्थ्यांना टोप्या व लाडूंचे वाटप केले तर
’फ्रेंड्स ऑफ विक्रमसिंह’ ग्रुप यांनीही लाडूंचे वाटप केले.
या सोहळ्यात यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, विभागप्रमुख आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, अजित साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, सौ. सुनीता पाटील, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, धीरज मेंगाणे, विद्याधर परीट, सौ.राजवी साठे, प्रा.सौ.रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे,सौ. एल.आर.पाळेकर, संतोष पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, शुभम कोकाटे, श्रावणी मोरे, श्रेया घोडके, निवृत्त मुख्याध्यापक आर. वाय. देसाई, बी. ए. डावरे, अमृत देसाई, श्रीपती चव्हाण, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, सौ. मंगल कांबळे, उत्तम अस्वले, विश्वास केणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
याकामी नामदेव शिंदे (मडीलगे बुद्रुक), विजय पाटील, सत्यजित मुगडे, प्रसाद वायदंडे, श्री.रणजित कल्याणकर, रणजीत देसाई, शिवाजी भराडे, अजित शिंदे, सार्थक परुळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि भारतीय परंपरेप्रती आदर या मूल्यांचे प्रभावी संवर्धन केले. शिक्षणाबरोबरच संस्कारांची जोपासना अशी ओळख शाळेने निर्माण केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





