नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आजच्या व्यावसायिक युगातही समाजाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था उभी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. घाळी यांनी केले : पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आजच्या व्यावसायिक युगातही समाजाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था उभी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. घाळी यांनी केले : पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आजच्या व्यावसायिक युगातही समाजाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था उभी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. घाळी यांनी केले : पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे

‘डॉ. घाळी समाजभूषण’ पुरस्काराने पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा गौरव

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज (राजेंद्र यादव)
समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे कार्य शिक्षणसंस्था करतात. आजच्या व्यावसायिक युगातही समाजाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था उभी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. घाळी यांनी केले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे विविध क्षेत्रांत नामवंत विद्यार्थी घडले. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी आहे त्यात समाधान न मानता बदलत्या काळानुसार आपली गुणवत्ता व प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.
‘डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर डॉ. प्रभाकर कोरे बोलत होते. यावेळी महास्वामीजी श्री. म. नि. प्र. जगद्गुरू डॉ. पंचम शिवलिंगेश्वर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना २५ हजार रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्री. दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ, निडसोशीचे महास्वामीजी डॉ. पंचम शिवलिंगेश्वर म्हणाले की, अंकलीसारख्या छोट्या गावातून आलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांनी सर्वसामान्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देत के.एल.ई. शिक्षण संस्थेला राष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून दिला. त्यांचा ‘डॉ. घाळी समाजभूषण’ पुरस्काराने झालेला सन्मान हा समाजकार्यासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणाऱ्या डॉ. घाळी यांना खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ म्हणता येईल. युवकांना ज्ञानदान करून उज्ज्वल समाज घडविणे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे ३९ वे वर्ष आहे. पुरस्काराची २५ हजार रुपयांची रोख रक्कम पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी संस्थेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून संस्थेकडे सुपूर्द केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे सहसचिव सीए गजेंद्र बंदी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कार्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. डॉ. घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच प्रा. आर. एस. सावेकर संपादित ‘कर्मयोगातून समाजभूषणाकडे’ या डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याची माहिती देणाऱ्या ई-बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव ॲड. बी. जी. भोसकी, संचालक ॲड. विकास पाटील, शिवकुमार कोल्हापूरे, इंजि. किशोर हंजी, महेश घाळी, संगाप्पाण्णा दड्डी, अशोक कंगुरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पत्रकार उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर व शांभवी देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव ॲड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31