नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता : राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता : राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता : राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक, पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.

चौकट : राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजाराहून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930