नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय संस्कृती टिकली तरच कुटुंब व्यवस्था टिकेल : ॲड.घनश्याम ठाकूर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भारतीय संस्कृती टिकली तरच कुटुंब व्यवस्था टिकेल : ॲड.घनश्याम ठाकूर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भारतीय संस्कृती टिकली तरच कुटुंब व्यवस्था टिकेल : ॲड.घनश्याम ठाकूर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भारतीय संस्कृती टिकली तरच कुटुंब व्यवस्था टिकेल असे प्रतिपादन ॲड.घनश्याम ठाकूर यांनी केले.
हुतात्मा नारायण वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुदरगड (गारगोटी) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार “शिवराज्याभिषेक दिन” साजरा करण्यात आला.
प्रमुख वक्ते ॲड.श्री.घनश्याम ठाकुर यांनी नागरी कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण विषयावर प्रशिक्षणार्थी तसेच सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. या पाच विषयांची त्यांनी परिवर्तन म्हणून व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय हितास फायदा व्हावा या दृष्टीने विचार मांडले.
प्रमुख अतिथी ॲड.अरविंद कदम यांनी आय.टी.आय.नंतरचे भवितव्य याबद्दल प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा केली. या यावेळी संस्था व्यवस्थापन समितीचे श्री.केदार पाटकर, डॉ. विनायक परुळेकर, श्री. श्रीकांत कांबळे तसेच श्री.आदर्श पाटील, श्री. ऋषिकेश गव्हाणकर संस्थेचे सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. किशोर होणाजे यांनी प्रास्ताविक श्री.सचिन ऐनापूरे तर आभार श्री.भरत कदम यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930