नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजसदर किल्ले भुदरगडवर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राजसदर किल्ले भुदरगडवर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राजसदर किल्ले भुदरगडवर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शिवकाळाचा साक्षीदार किल्ले भुदरगड ह्या पठारी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा अभिषेक व वृक्षारोपण करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली ९ वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबीय करत आहेत.
भक्कम तटबंदी व शिवकालीन वास्तू व अवशेषांनी परिपूर्ण असणाऱ्या गारगोटी शहरानजीकच्या भुदरगड ह्या पठारी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबियांकडून रांगोळी, फुले, हार, फेटे, भगवे ध्वज, पताका यासह राजसदर सजविण्यात आली, सुखदेव मगदूम यांच्या हस्ते शिवमूर्तीस पुष्पहार व अभिषेक घालण्यात आला, मिथाली पाटील हिच्या शिवगारदाने वातावरण शिवमय होऊन गेले, ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण केले शिवाय वर्षभरात विविध देशी झाडांचे रोपण करण्याचा संकल्पही करण्यात आला.
जान्हवी पाटील हिने शिवप्रेरणा मंत्र पठण केले, प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली, राज्याभिषेक सोहळ्यासाठी अवधुत पाटील, प्रणव पाटील, क्षितिज पाटील, ऋतुराज निकम, शंभूराजे पाटील, सृष्टी निकम, वैष्णवी पाटील, जान्हवी पाटील व मिथाली पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930