नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.नामदेवराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.नामदेवराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.नामदेवराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खा.आठवले) तालुकाध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महिला विद्यापीठचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.नामदेवराव दादू कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण राज्याचे मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मंगळवार दि. १० जून रोजी स. १० वा. होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री नाम.संजय शिरसाठ, सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.माधुरी मिसाळ, खास. अरविंद सावंत प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.
अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त जाती या प्रवर्गातील बेघर महिला – पुरूषांना ‘स्वतःचे हक्काचे घर मिळणेसाठी गारगोटी गावानजीक हणबरवाडी हद्दीतील गायरान जमीन उपलब्ध होण्यासाठी १९९० पासून आजअखेर अखंड आंदोलने, मोर्चे, उपोषणे शांततेच्या मार्गाने सुरू आहेत.
भुदरगड तालुका भूमिहीन,शेतमजूर संघाची स्थापना करून बेघरांना घरकुल योजने्दारे १६२ पात्र लाभार्थींना घरासाठी जागा मंजूर करून दिली. देवदासी महिलांना आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी ६३० महिलांना पेन्शन मंजूर करून दिली. देवदासी प्रथा निमूर्लन करण्याचे काम आजपर्यत सुरूच आहे. ५३ देवदासी महिलांचे विवाह करून दिले आहेत.
मागासवर्गीय विद्यर्थीनींसाठी गारगोटी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय विद्यार्थीनी वसतिगृह सुरु केले आहे. देवदासी मुलींच्या शिक्षणासाठी राज्यातील एकमेव माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल सुरू केले आहे.
श्री. कांबळे यांनी शासकीय वसतिगृह जिल्हास्तरीय निरीक्षण समिती,जिल्हा दक्षता समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. तर पद दलित शिक्षण संस्था, भुदरगड तालुका देवदासी निर्मूलन संघटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महिला विद्यापीठ, भुदरगड तालुका बेघर,भूमिहीन, शेतमजूर, विधवा निराधार विकास संघ, वेदगंगा किनारा स्वयंरोजगार औद्यौंगिक सहकारी संस्था, कोल्हापूर जिल्हा मागासवर्गीय वसतिगृहे चालक संघ, जनकल्याण समाजोन्नती, अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती, पंडित दीन दयाळ उपाध्याय नाविण्यपूर्ण सहकारी संस्था आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930