नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवीन पेन्शन योजनेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार ४ जुलै रोजी श्री.शाहू वाचनालय येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नवीन पेन्शन योजनेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार ४ जुलै रोजी श्री.शाहू वाचनालय येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नवीन पेन्शन योजनेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार ४ जुलै रोजी श्री.शाहू वाचनालय येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजनेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शाहू वाचनालय, गारगोटी येथे आयोजित केला आहे. तरी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भुदरगड तालुक्यातील विविध सेवानिवृत्त संघटनांच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना २०२५ संबंधी विचारविनिमय करण्यासाठी गेल्या महिन्याभरामध्ये विविध वृत्तपत्रातून आणि समाज माध्यमातून नवीन आठवा वेतन आयोग व निवृत्तीवेतन सुधारणा अधिनियम २०२५ संबंधी बातम्या व लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यानुसार सेवानिवृत्तांना आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता न देणे त्याचप्रमाणे विशिष्ट टप्प्यावर पेन्शन रक्कम कुंठीत (गोठविणे) असे शासन निर्णय पुढे येत असल्याबद्दलची सार्वत्रिक चर्चा असून या शासन निर्णयामुळे सेवानिवृत्तांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान व मानहानी होणार आहे. ही धोक्याची घंटा ओळखून त्यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मेळावा शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शाहू वाचनालय, गारगोटी. येथे आयोजित केला आहे. तरी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे भुदरगड तालुक्यातील विविध सेवानिवृत्त संघटनांच्या पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930