नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रायव्हेट हायस्कूल व महानगरपालिकेच्या वतीने कळंबा परिसरात वृक्षारोपण : ‘एक पेड माँ के नाम’ हा केंद्रशासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प्रायव्हेट हायस्कूल व महानगरपालिकेच्या वतीने कळंबा परिसरात वृक्षारोपण : ‘एक पेड माँ के नाम’ हा केंद्रशासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रायव्हेट हायस्कूल व महानगरपालिकेच्या वतीने कळंबा परिसरात वृक्षारोपण : ‘एक पेड माँ के नाम’ हा केंद्रशासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जपण्या नैसर्गिक पर्यावरण करूया वृक्षसंवर्धन यास अनुसरून ‘एक पेड माँ के नाम’ हा केंद्रशासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर मध्ये कार्यरत असणारा इको क्लब व एनसीसी विभाग यांच्यामार्फत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील नगर जवळ, पुईखडी या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून जवळजवळ ३०० वृक्षांचं रोपण करून साजरा करण्यात आला.
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखूनच शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मध्ये वृक्ष रोपण, वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन या मूल्यांची रुजवणूक व्हावी व भविष्यातील पर्यावरण टिकवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे, यासाठी प्रशालेकडून हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमामध्ये वड, करंज, लिंब व बाभूळ या प्रकारची जवळजवळ 300 रोपे लावण्यात आली.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील इयत्ता नववीचे एनसीसी व इको क्लबचे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, राम चव्हाण तसेच मुकादम विनोद पारमेकर, शशी लाड, माळी मामा त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जी.एस. जांभळीकर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना वृक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षण याचे महत्त्व सांगितले. व असे पर्यावरण पूरक कार्यक्रम इथून पुढेही शाळेकडून आयोजित केले जातील, यामध्ये सर्व पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
प्रशालेचे जिमखाना प्रमुख श्री. डी. सी. पाटील यांच्या प्रयत्नातून वृक्षारोपण यासाठी आवश्यक खड्डे मारण्यासाठी महानगरपालिकेकडून जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच आवश्यक वृक्ष उपलब्ध करून मिळाले.
या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जी.एस. जांभळीकर, उपमुख्याध्यापक श्री.पी.एम. जोशी, पर्यवेक्षक श्री. एस. आर.गानबावले, जिमखाना प्रमुख श्री. डी. सी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. एनसीसी प्रमुख श्री. डी. एम. रेडेकर व श्रीमती एस. एस. माने, तसेच सहकारी शिक्षक श्री. ए. डी. पाटील व श्री. आर.एम. कुंभार या सर्वांचे सहकार्य लाभले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एनसीसी एअरविंग,आर्मी विंग तसेच प्रशालेच्या इको क्लब मधील विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक उपस्थित होते. वरील सर्व उपक्रमाचे नियोजन प्रशालेचे टेक्नोसेव्ही अध्यापक व प्रशालेच्या इको क्लबचे प्रमुख श्री.आर.डी.जाधव यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31