नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अलौकिक प्रतिभेचे आदर्श उदाहरण : व्ही.जे.कदम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अलौकिक प्रतिभेचे आदर्श उदाहरण : व्ही.जे.कदम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अलौकिक प्रतिभेचे आदर्श उदाहरण : व्ही.जे.कदम

श्री.राजर्षी शाहू विद्यार्थी वसतिगृहात येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले असले तरी त्यांनी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठे म्हणजे अलौकिक प्रतिभेचे आदर्श उदाहरण होते, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष, शासनाचा समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्ही. जे. कदम यांनी काढले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.राजर्षी शाहू विद्यार्थी वसतिगृह, गारगोटी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरुन श्री.कदम बोलत होते.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव प्राचार्य मिलिंद पांगिरेकर म्हणाले, लोकशाहीवादी अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी श्री.मौनी महाराज (बनारस) हायस्कलचे मुख्याध्यापक श्री. एन. जी. कांबळे, डी. जी. कांबळे, कु.सिद्धेश लाड, कु.यश कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी संपर्क प्रमुख दशरथ पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री.राजर्षी शाहू विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक साताप्पा कांबळे यांनी तर आभार चंद्रकांत पोवार यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930