नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रावणाला स्वरधाराचा सांगितीक साज : प्राचार्य अर्जुन आबिटकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्रावणाला स्वरधाराचा सांगितीक साज : प्राचार्य अर्जुन आबिटकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्रावणाला स्वरधाराचा सांगितीक साज : प्राचार्य अर्जुन आबिटकर

स्वरधारा संगीत विद्यालयातर्फे ‘सोंगाड्या श्रावण’ सांगितिक कार्यक्रम संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
दरवर्षी श्रावण महिन्यात स्वरधारा संगीत विद्यालयातर्फे सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी दादा कोंडके यांच्या गाण्यांचा ‘सोंगाड्या श्रावण’ हा सांगितीक कार्यक्रम श्री.इंजुबाई सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला. स्वरधाराच्या या कार्यक्रमाने “श्रावणाला संगीताचा साज चढवला”असे उदगार केडीसीसी बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी काढले.
भुदरगड हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला तालुका आहे.या तालुक्यात अनेक क्रांतिकारकांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांनी मोलाची कामगिरी केली आहे. सांगितीक क्षेत्रात नवीन काही निर्माण करण्याची, मुलांना संगीताचे ज्ञान देण्याची आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची धडपड गारगोटीतील स्वरधारा संगीत विद्यालयातर्फे सुरु आहे.गेली अनेक वर्षे सांगितीक कार्यक्रम आयोजित केले जातात.या वर्षीचा “सोंगाड्या श्रावण” हा त्याचाच एक भाग. मानवी जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तालुक्यात आणि परिसरात संगीत वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू असे आश्वासन प्राचार्य आबिटकर यांनी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य अर्जुन आबिटकर, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हाईस चेअरमन मिलिंद पांगिरेकर, उपसरपंच प्रशांत भोई, माजी सरपंच वृषाली देसाई, श्रीमती खांडके (काकी) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले . दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत भुदरगड तालुक्यात चित्रीकरण झाले त्याच्या आठवणी मिलिंद ताम्हणकर यांच्या सहकाऱ्याने विशद करण्यात आल्या. दादांचा जीवनक्रम संघर्षाने कसा भारावलेला होता हे राम गव्हाणकर यांच्या निवेदनातून जाणवले. पावसाच्या गाण्यांबरोबर दादांच्या काय ग सखू, मुंबईची केळेवाली, जीवाशिवाची बैलजोड अशा एकापेक्षा एक सरस गाण्यानी श्रोत्यांना ताल धरायला लावला. विक्रम परीट(ऑक्टोपॅड),आकाश शिंदे (कीबोर्ड), ज्ञानेश कोळी(ढोलकी) यांनी संगीत साथ दिली. सिद्धिविनायक चे विनायक पोवार (निपाणी )यांचे ध्वनी संयोजन होते. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मालंडकर ज्वेलर्स आणि सहप्रायोजक त्रिमूर्ती फर्निचर मॉल, हॉटेल जयस्वी, सत्यम क्लॉथ स्टोअर्स गारगोटी हे होते.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख संजय कुकडे,मुख्याध्यापक एन.जे.चव्हाण, एम. व्ही. लाड,उपसरपंच सागर शिंदे,ह.भ.प बबन बेलेकर, गारगोटीच्या शोभा खांडकेकाकी, शुभांगी कुलकर्णी, डॉ.सम्रजिता थोरात, माजी गटविकास अधिकारी आनंदा रेडेकर,सुलभा ठाकूर,रमेश डेळेकर, तानाजी सोनाळकर, नंदू चौगले,रणजित देसाई (म्हसवे), आर.वाय. देसाई,हरिदास देसाई आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मुकुंदआबा देसाई, सर्जेरावतात्या देसाई, दत्ता करवळ, अजित देशपांडे, ऋषिकेश गव्हाणकर, अस्मिता गव्हाणकर, अनघा देशपांडे, सार्थक परुळेकर यांचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930