नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बैलांच्या शर्यतीमुळे माणसांची हौस पण प्राण्यांची छळणुक होते : संजय खोचारे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बैलांच्या शर्यतीमुळे माणसांची हौस पण प्राण्यांची छळणुक होते : संजय खोचारे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बैलांच्या शर्यतीमुळे माणसांची हौस पण प्राण्यांची छळणुक होते : संजय खोचारे

आदर्श गुरुकुलमध्ये २२ वा गुरुकुल कलाविष्कार महोत्सव संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पेठवडगाव
मुक्या बैलांना शर्यतीत पळवल्याने माणसांची हौस पण प्राण्यांची छळणुक होते. शर्यतीचा बैल जर बोलला असता तर माणसाचा क्रुरपणा त्यानेच सांगितला असता. मुक्या जिवाशी खेळणे वाईटच, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार संजय खोचारे यांनी कथाकथन सत्रात बोलताना केले.
आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा गुरुकुल कलाविष्कार महोत्सव संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.मुख्याध्यापिका एम.डी.घुगरे अध्यक्षस्थानी होत्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावं त्यांना वेगवेगळी कौशल्य आत्मसात करण्याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून या महोत्सवामध्ये ग्रामीण कथाकार संजय खोचारे यांचे कथाकथन सादर झाले.त्यांनी आपल्या शब्दांची सुंदर गुंफण करत आपली स्वलिखित वादाड ही कथा व द.मा. मिरासदार लिखित भाणाचं भूत ही कथा सादर केली. विडंबन गीत सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.या कार्यक्रमाचा विद्यालयातील २००० विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमासाठी आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलाच्या सचिव तथा मुख्याध्यापिका एम.डी. घुगरे , विद्यालयाचे पर्यवेक्षक एस जी. जाधव ,ग्रीन व्हॅली विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, पर्यवेक्षक एम. एच.चौगुले, प्रशासक एस. ए. पाटील, एस.एस.गिरी गोसावी ,सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.पी.शिसोदे ,सर्व विभागाचे प्रमुख विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी अभिनव मोहिते,विराज कदम,शिवराज सुतार , जे .ए. आयरेकर यांनी केले.ए. एन. इंगवले यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31