नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानाच्या शोधात पाटगाव येथील संत श्री.मौनी महाराज मठापर्यंत पोहोचले जर्मन शिवचरित्र अभ्यासक हेल्मुट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानाच्या शोधात पाटगाव येथील संत श्री.मौनी महाराज मठापर्यंत पोहोचले जर्मन शिवचरित्र अभ्यासक हेल्मुट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानाच्या शोधात पाटगाव येथील संत श्री.मौनी महाराज मठापर्यंत पोहोचले जर्मन शिवचरित्र अभ्यासक हेल्मुट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पाटगाव
छत्रपती शिवरायांच्या गुरुस्थानी असलेल्या संत श्री.मौनी महाराज यांच्या शोधात जर्मन देशातील शिवचरित्र अभ्यासक हेल्मुट बेरंट पाटगांव (ता. भुदरगड) येथे पोहोचले होते.
हेल्मुट हे सध्या ऑस्ट्रिया आणि जर्मनी येथे शिवचरित्राचा अभ्यास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व कौतुकास्पद विषय आहे. राज्यकारभार, मौन, मठ हा यांचा परस्परसंबंध कसा आहे हे पाहण्याच्या निमित्ताने ते पाटगाव येथील संत श्री.मौनी महाराज मठात पोहोचले. त्यांनी प्रथम जर्मनीत मठ (माॅनस्टेरी) आणि मौन (श्र्वायगेन) याला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले. जर्मनीत सेंट ब्रुनो, सेंट मेईस्टर एकहार्ट हे मौन धारण करणारे श्रेष्ठ संत होते. पण अध्यात्मिक दृष्ट्या संत श्री.मौनी महाराज आपल्याला श्रेष्ठ वाटतात. त्यांच्या जीवंत समाधीस्थळी आपल्याला वेगळीच अनुभुती आल्याचे त्यांनी सांगितले.
छ. शिवाजी महाराज यांचे गुरुस्थानी असलेल्या या संताच्या ठिकाणी मला वेळ घालविण्याचे भाग्य मिळाले. असे मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथील डॉ.रवी जाधव यांच्या माध्यमातून ते आले होते. मठाचे मठाधिपती श्री.संजयसिंह बेनाडीकर सरकार यांनी त्यांना मठाचा इतिहास आणि माहिती दिली. प्रत्यक्ष मठाधिपतींशी भेट झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. श्रीमंत क्षात्र जगद्गुरु पीठाद्वारे भगवी वस्त्रे संत श्री.मौनी महाराजांची प्रतिमा, श्रीमंत क्षात्र जगद्गुरु महाराज गौरव ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. सोबत शिवजीत बेनाडीकर, मनजीत बेनाडीकर हे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031