नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शैक्षणिक गुणवत्ता हीच भुदरगड तालुक्याची ओळख : शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शैक्षणिक गुणवत्ता हीच भुदरगड तालुक्याची ओळख : शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शैक्षणिक गुणवत्ता हीच भुदरगड तालुक्याची ओळख : शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत भुदरगड तालुका नेहमीच अग्रेसर राहिला असून शैक्षणिक गुणवत्ता हीच तालुक्याची ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाणे यांनी काढले. एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत ३१६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनल्याने तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.
श्री. इंजुबाई सांस्कृतिक भवन येथे भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात श्री. मेंगाणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.माने होते.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा बरोबरच आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून विविध छंद जोपासण्याची आवश्यकता आहे. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक डी.पी.पाटील, आर. जी.सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी कोजिम गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संतोष भोसले ( तांबाळेश्वर हायस्कूल तांबाळे), सुभाष पाटील (टिक्केवाडी हायस्कूल), आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक डी.एम.कासारीकर (एस.डी. हायस्कूल म्हसवे), गुरुवर्य स्व.डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कारप्राप्त डी.जी.कांबळे (श्री. मौनी महाराज बनारस हायस्कूल), जनस्वास्थ्य दक्षता समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त युवराज शिगावकर (गारगोटी हायस्कूल), राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावल्याबद्दल प्रा. सुधीर गुरव (उदाजीराव डी. एड. कॉलेज) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दानशूर निवृत्त मुख्याध्यापक डी.पी.पाटील व अमर देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाचालक संघाचे संचालक के.ए.देसाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी. एस. देसाई, माजी सभापती सौ.आक्काताई नलवडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अभिजित पोवार, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार, डॉ.एस.बी.शिंदे, राजेंद्र साळोखे, बबन इंदुलकर, प्रकाश पाटील, एस.के.कासार, सौ.आर्या पाटील, एस.आर.पाटील, महावीर पाटील यांच्यासह तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार संतोष भोसले यांनी तर सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930