नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आरुष मुसळे याचे विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आरुष मुसळे याचे विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आरुष मुसळे याचे विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर येथील वसंतराव देशमुख हायस्कूल (इंग्रजी माध्यम) या प्रशालेतील कु.आरुष सिध्दी विनायक मुसळे (इ.४थी ) याने विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. कु.आरुषने यावर्षी “डी.टी.एस.” ( देशमुख टॅलेंट सर्च) परीक्षेत ३०० पैकी २६६ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वी इ.१ली ते ४ थी अशी सलग चार वर्षे या परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक पटकावून रेकॉर्ड केले आहे. तर “बी.डी.एस.” ( ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप) या राज्यस्तरीय परीक्षेत १०० पैकी ८८ गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले आहे. तर “मंथन “या राज्यस्तरीय परीक्षेत तीनशे पैकी २७० गुण मिळवून राज्यात १६ वा क्रमांक तर जिल्ह्यात ११ वा क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी त्याने अशाचप्रकारे यश मिळवले आहे. तर शालेय परीक्षांमध्ये यापूर्वी, दरवर्षी विशेष गुणवत्तेसह पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊन आपल्या यशाची कमान चढती ठेवली आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण यशात प्रशालेच्या प्राचार्या रुपा पास्ते, वर्गशिक्षिका वर्षा वेदान्ते आणि सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे अध्यक्ष शारंगधर देशमुख यांचे तसेच त्याचे पालक सौ . सिध्दी विनायक मुसळे – साळोखे यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930