नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास हायकोर्टाची स्थगिती : भरत रसाळे व अंबादास नन्नवरे यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास हायकोर्टाची स्थगिती : भरत रसाळे व अंबादास नन्नवरे यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास हायकोर्टाची स्थगिती : भरत रसाळे व अंबादास नन्नवरे यांची माहिती

​ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
खाजगी प्राथमिक शाळेतील लिपिक व सेवक या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करावे असा आदेश १७ एप्रिल २०२६ रोजी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेला होता. या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती संलग्नित मराठवाडा प्राथमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्र .CA 5387/2026 ने दाद मागितली होती. या याचिकेमध्ये RTE 2009 या कायद्यासह दि 17 एप्रिल 2026 च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र समायोजन करण्याच्या आदेशास स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. याची 6 मे रोजी न्यायाधीश किशोर संत व न्यायाधीश सुशील घोडेस्वार यांच्या समोर तात्काळ सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या अन्यत्र समायोजनास स्थगिती दिली असून याबाबतचे लेकी म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारला व राज्य शासनाला 11 जून पर्यंत मुदत दिलेली आहे. तोपर्यत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेशित केले आहे. या आदेशामुळे राज्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधान पसरलेले आहे.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर, सहायक शिक्षण संचालक डॉ. गणपती कमळकर व शिक्षण निरीक्षक बालाजी यरनाडकर यांची भेट घेऊन या याचिकेचा अंतिम निर्णय लागेपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करू नये अशी विनंती केली ‘ती या सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलेली आहे. तसेच राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांना देखील निवेदन देऊन 17 एप्रिल 2026 च्या आदेशास स्थगिती दिलेली असलेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करण्याची प्रक्रिया थांबवावी असे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना द्यावेत अशी मागणी केलेली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी व्हावी यासाठी भरत रसाळे, रविंद्र देशपांडे, अंबादास नन्नवरे व विश्वनाथ शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह राज्यसचिव शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष कुमार पाटील, शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे, पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार, संस्थापक विठ्ठल पाटील, कृष्णात चौगुले, सर्जेराव नाईक, यशवंत पाटील, प्रल्हादसिंह शिलेदार, पांडूरंग नायकवडे, शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे, एस एस पाटील, राजेंद्र कांबळे, संजना देसाई, रघुनाथ पाटील सचिन वसावे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930