गारगोटी हायस्कूल येथे शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूल येथे शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत

‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसह शपथ
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, खाऊ, पाठ्यपुस्तके देऊन जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ.सुवर्णा सावंत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसह शपथ घेण्यात आली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला. यावेळी शाळा परिसरात रांगोळी तसेच आकर्षक वर्गसजावट करण्यात आली होती. शाळेत उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व पालकांचे मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर यांनी स्वागत केले. यावेळी आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, धीरज मेंगाणे, विद्याधर परीट, सौ.राजवी साठे, संतोष पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, श्रावणी मोरे, शुभम कोकाटे, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, सौ. मंगल कांबळे, उत्तम अस्वले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





