नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डोंगरी भागातील मुलींच्या शिक्षणाला सायकलची गती; नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून ५०० विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डोंगरी भागातील मुलींच्या शिक्षणाला सायकलची गती; नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून ५०० विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डोंगरी भागातील मुलींच्या शिक्षणाला सायकलची गती; नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून ५०० विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
ग्रामीण आणि दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थिनींचा शाळेचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षणातील आर्थिक व भौगोलिक अडथळे दूर व्हावेत, या उदात्त हेतूने भुदरगड तालुक्यात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि CSR फंडाच्या माध्यमातून तालुक्यातील ७० गावांतील तब्बल ५०० गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे भव्य वितरण करण्यात आले.
‘आबिटकर नॉलेज सिटी’, पाल येथील शैक्षणिक संकुलाच्या परिसरात अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात सोहळा पार पडला.
​भुदरगड तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागात वाहतुकीच्या पुरेशा सोयींअभावी मुलींना शिक्षणासाठी मैलोन्मैल पायी जावे लागते. हीच अडचण ओळखून इयत्ता ५ वी ते ९ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या ७० गावांतील ५०० विद्यार्थिनींची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सायकलींचे कुलूप उघडून व हिरवा झेंडा दाखवून या सायकली विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आल्या. सायकल हाती पडताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमलले, तर आपल्या लेकींचा रोजचा त्रास वाचणार या भावनेने पालकांचे डोळेही पाणावले.
“शिक्षणाची वाट आता झाली सोपी!” – पालक आणि विद्यार्थिनींच्या भावना
​”डोंगरी भागात एसटी वेळेवर नसेल तर मुलींना पायी जावे लागायचे, ज्यामुळे त्यांची शाळा बुडण्याची भीती असायची. पण आज मिळालेल्या या सायकलमुळे आमच्या मुलींचा वेळ वाचणार आहे आणि त्या अधिक आत्मविश्वासाने शाळेत जाऊ शकतील. आबिटकर साहेबांनी आमच्या गरिबांच्या मुलांचा विचार केला, यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत,” अशी कृतज्ञता उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
​ यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना कल्याणराव निकम, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक प्रा. दौलतराव जाधव, पंचायत समितीचे सभापती श्री. विक्रमसिंह पाटील उपसभापती सौ. अरुणा प्रशांत देसाई, माजी सदस्य श्री. मदनदादा देसाई पंचायत समिती सदस्य श्री. सुनिल किरकोळ, श्री. धनंजय लाड, सौ. कल्याणी युवराज फगरे, युवा सेना तालुकाप्रमुख श्री. विद्याधर परीट, पांगिरेचे सरपंच श्री. मारुती भराडे, श्री. विजय रामाणे, भेंडवडेचे माजी उपसरपंच श्री. रमेश पाटील, श्री. बबन निळपनकर (हेळेवाडी), शेतकरी सेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. युवराज फगरे, श्री. प्रशांत देसाई (कडगाव), श्री. डी. बी. जाधव, श्री. रघुनाथ बोटे (बामणे), श्री. आनंदराव शेवाळेकर, श्री. बाबुराव शिऊडकर, श्री. अवधूत परुळेकर (MD), यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. आभार संग्राम शिंदे यांनी तर सूत्रसंचलन श्री.नंदकुमार निर्मळे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31