नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वरिष्ठ पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
गुरूवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय, आणि पदमश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. देशपांडे हे गेली ३० वर्षे पत्रकारितेमध्ये असून त्यांनी ग्रामविकासाबाबत सातत्याने लेखन केले आहे. ग्रामविकास क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय बातम्यांचा परिणामही झाला असून त्याचे प्रतिबिंबही शासन निर्णयात उमटले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांसाठीच्या कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या अधिस्वीकृती विभागीय समितीचे ते अध्यक्ष असून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामही उभे केले आहे. ते मुळचे आजरा तालुक्यातील चिमणे येथील असून सध्या ते कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930