*वन्यजीव सप्ताहानिमित्त चंदगड तालुक्यात सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*वन्यजीव सप्ताहानिमित्त चंदगड तालुक्यात सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चंदगड
वन्यजीव सप्ताहानिमित्त श्री.व्ही.के.सी.पी.विद्यालय कागणी, मराठी विद्यामंदिर कागणी, मराठी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, श्री.दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक (ता.चंदगड) या शाळांतील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे वन्यजीव संरक्षक शुभम पांडे, अभिजीत वाघमोडे, जोतिबा जोशीलकर, अनुप शेलार, श्रेयस पट्टणशेट्टी, विनोद कांबळे, वैशाली लोहार, बाळकृष्ण लोहार व कार्तिक हिरेमठ आदी सहभागी झाले होते.
सदरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी श्री व्ही.के.सी.पी.विद्यालय, कागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.आर. कांबळे, मराठी विद्यामंदिर कागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कुरवी, मराठी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुकचे मुख्याध्यापक श्री.मोटुरे व इतर सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





