नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही मुख्याध्यापकांवर असते. त्याचबरोबर संस्थाचालक व शिक्षकांमधील महत्त्वाचा दुवा हा मुख्याध्यापक असतो. या दोन्ही ठिकाणी मुख्याध्यापक आपली जबाबदारी सक्षम व प्रामाणिकपणे पार पाडत असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे व उद्योजक व लेखक शरद तांदळे यांच्या हस्ते मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, आज शासन विविध आदेश काढून शिक्षक बांधवांचे खच्चीकरण करत आहेत. शिक्षणाचे होणारे कंत्राटीकरण, २० पटावरील शाळा बंद करणे, दत्तक शाळा योजना तसेच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे या कारणांमुळे आज शाळांची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघासह इतर संस्था संघटनांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे.
राज्यात अकॅडमीचे प्रस्थ झपाटाने वाढत आहे. याला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
जुनी पेन्शन योजनेसह शिक्षण क्षेत्रातील इतर प्रश्न सोडवण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यात कोठेही कमी पडणार नाही.
पुरस्कारप्राप्त सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे अभिनंदन करून आमदार जयंत आसगावकर म्हणाले, या पुरस्कारामुळे तुम्हाला काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळणार आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के.पाटील, सचिव शांताराम पोखरकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष मधुकर नाईक, उपाध्यक्ष सुरेश कांचन, राम पाडुळे, नवनाथ ठेंगल, मारुती कदम, राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष अरुण थोरात, शिवाजी किलकिले, शिवाजी खांडेकर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी कामथे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शेख सर, आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बोबले सर, शिवाजी शिंदे, सुजित जगताप, सुधाकर जगदाळे, भानुदास रिठे, रामनाथ इथापे, बोरसे सर, मिसाळ सर, यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष सचिव व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930